S M L

पुणे महापालिका पोटनिवडणुक: भाजप-रिपाइंच्या हिमाली कांबळे विजयी

आपल्याबरोबर सर्वजण होते म्हणून जिंकू शकले अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 12, 2017 12:19 PM IST

पुणे महापालिका पोटनिवडणुक: भाजप-रिपाइंच्या हिमाली कांबळे विजयी

पुणे,12 ऑक्टोबर:पुणे महानगरपालिकेच्या कोरेगाव घोरपडी पोटनिवडणुकीत 4 हजार ४८३मतांनी भाजप- आरपीआय युतीची हिमाली कांबळे विजयी झाल्या आहेत. आपल्याबरोबर सर्वजण होते म्हणून जिंकू शकले अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग २१ अ कोरेगाव पार्क घोरपडी पोटनिवडणुकीत काल २०.७८ टक्के इतक अल्पमतदान झालं होतं. उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यासाठी नवनाथ कांबळे यांची मुलगी हिमाली कांबळे यांना भाजप-रिपाइं युतीकडून उमेदवारी देण्यात आली. हिमाली कांबळे यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविली. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धनंजय गायकवाड हे रिंगणात होते. मनसे ,शिवसेनेचा इथे उमेदवार दिलेला नव्हता. काँग्रेसने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. हिमाली कांबळे यांचं पारड जड असल्याची चर्चा होती. भाजप आरपीआय युतीच्या हिमाली कांबळे यांना या निवडणुकीत ७ हजार ८९९ मते तर राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड यांना ३ हजार ४१६ मते मिळाली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2017 12:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close