S M L

राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंच्या भावाच्या हाॅटेलमध्ये दारूविक्री, पोलिसांचा छापा

कुर्डुवाडी येथील धनश्री हॉटेलमध्ये अवैधरितीने मद्यविक्री सुरू असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती

Sachin Salve | Updated On: Apr 6, 2017 09:21 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंच्या भावाच्या हाॅटेलमध्ये दारूविक्री, पोलिसांचा छापा

06 एप्रिल : हायवेलगत दारूविक्री बंदी करण्यात आली आहे. मात्र, कायद्याला धाब्यावर बसून सर्रास दारूविक्रीचे प्रकार सुरूच आहे. सोलापुरात राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांच्या मालकीच्या धनश्री हॉटेलमध्ये दारू विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय.

सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांच्या मालकीच्या धनश्री हॉटेलवर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाकडून छापा मारण्यात आला. दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलीय.

कुर्डुवाडी येथील धनश्री हॉटेलमध्ये अवैधरितीने मद्यविक्री सुरू असल्याची तक्रार पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत एसपींच्या विशेष पथकाने हा कारवाई केली.



राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल धनश्रीला दारू विक्री करण्यास मज्जाव केला होता. मात्र तरीही हॉटेल व्यवस्थापनाकडून मद्यविक्री केली जात होती. त्याची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे आल्यानंतर त्यांच्या विशेष पथकाने रमेश शिंदे यांच्या मालकीचे हॉटेल धनश्री आणि इतर हॉटेलवर ही कारवाई केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 09:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close