500 मिटरवरून 220 वर, 'त्या' भागात दारू विक्री सुरू होणार

500 मिटरवरून 220 वर, 'त्या' भागात दारू विक्री सुरू होणार

मात्र आता नवीन नियमानुसार अनेक दुकानं बार यांच्यासोबत कामगारांचा रोजगार परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • Share this:

07 एप्रिल : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील सर्व हायवेवरील पाचशे मिटर अंतरातील दारू बंदी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक दुकाने बार कामगार संकटात आले होते. मात्र आता नवीन नियमानुसार अनेक दुकानं बार यांच्यासोबत कामगारांचा रोजगार परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवीन नियमानुसार हायवे नजिक असलेल्या गावांची संख्या 20 हजार किंवा त्या पेक्षा कमी असेल त्या ठिकाणी 500 मिटरची अट कमी करुन 220 मिटरवर आली आहे. त्यामुळे 20 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तालुके किंवा मोठे खेड़े येथील बार दारू दुकानं सुरू राहतील.

आता राज्यातील महसूल विभागाने 220 मिटर आतील दुकानं, बारचे सर्व्हे सुरू केले आहे. आणि त्यांना आपला परवाना पत्र नुतनीकरणासाठी पाठवण्याचं आवाहन केलं आहे. लोक संख्या 2011 च्या जन-गननेनुसार ग्राह्य धरली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2017 08:38 PM IST

ताज्या बातम्या