News18 Lokmat

आम्हाला हायवे नकोच !, बारबंदीविरोधात पालिकांचा खटाटोप

जवळपास डझनभरापेक्षा जास्त जिल्हाधिकारी तसंच पालिकांनी त्या त्या शहरातून जाणारे हायवेज हस्तांतरीत करण्याची मागणी केलीये

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2017 05:41 PM IST

आम्हाला हायवे नकोच !, बारबंदीविरोधात पालिकांचा खटाटोप

04 एप्रिल : सुप्रीम कोर्टाच्या बारबंदीला बगल देण्यासाठी सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी युद्धपातळीवर कामाला लागल्याचं चित्रं आहे. कारण जवळपास डझनभरापेक्षा जास्त जिल्हाधिकारी तसंच पालिकांनी त्या त्या शहरातून जाणारे हायवेज हस्तांतरीत करण्याची मागणी केलीय.

सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत बार, तसंच दारूच्या दुकानांवर बंदी आणलीय. पण शहरांमधून जर राज्यमार्ग जात असतील आणि ते जर महापालिका किंवा नगरपालिकेकडे हस्तांतरीत केलेली असतील तर त्यांना हा नियम लागू होणार नाही.

या नियमात सध्या त्या त्या ठिकाणाच्या पालिका आणि अधिकारी पळवाट शोधत राज्यमार्गांना कधी नाही ते पालिकेत हस्तांतरीत करून घेण्यासाठी धावपळ करत आहे.

संबंधित बातम्या

"न रहेगी बाँस, न बजेगी बाँसुरी",हायवे दारुबंदीवर जळगाव पालिकेची नामी शक्कल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2017 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...