नारायण राणेंच्या फार्महाऊसवर महामार्ग विभागाचा हातोडा

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2018 07:40 PM IST

नारायण राणेंच्या फार्महाऊसवर महामार्ग विभागाचा हातोडा

कर्नाळा, 08 आॅक्टोबर : मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणादरम्यान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या फार्महाऊसवर कारवाई करण्यात आलीये. राणे यांच्या फार्महाऊस

मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणादरम्यान तारा गावातील बांधकामे पाडण्यासाठी आज सकाळी प्रारंभ झाला. भुसंपादन अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी पोलीस फौज फाट्यासह तारा गावात अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीही मालमत्तेवर जेसीबी चालवून कारवाई करण्यात आली. या जमिनीचा मोबदला २०१७ मध्ये आदा करण्यात आला होता पण आजतागायत मालमत्तेचा ताबा घेण्यात आला नव्हता.

तो ताबा आज घेण्यात आला. यावेळी राणे यांच्या फार्म हाऊसची कंपाउंड वॉल तोडण्यात आली. 21 गुंठे जमीन संपादीत करण्यात आली आहे.

Loading...

मुंबई गोवा हायवेवर आज कारवाई सुरू करण्यात आली. तारा ते खारपाडा दरम्यान, घरी आणि फार्महाऊसवर कारवाई करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2018 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...