नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विदेशी महिला ताब्यात

नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, विदेशी महिला ताब्यात

या महिलेकडून २ लाख ८५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, 20 सप्टेंबर :  नागपूर पोलिसांनी एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून यात दलाल असलेली महिला आणि तिच्या साथीदारला अटक करण्यात आलीये. तर दोन युवतींना सुद्धा ताब्यात घेतलंय.

नागपूरच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये हाय प्रोफाइल देह व्यापार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आपल्या माणसाला त्या ठिकाणी ग्राहक बनवून पाठविलं आणि या सगळ्या रॅकेटची सूत्रधार असलेल्या प्रणिता जयस्वाल नावाच्या महिलेला तो भेटला आणि मग सगळा पर्दाफाश झाला.

या मुली विदेशी असल्याचं सांगितलं जात आहे मात्र त्यांच्या कडे असलेल्या ओळख पत्रावरून त्या दिल्लीच्या असल्याचं दिसून येते मात्र पोलिसांना त्या विदेशी असल्याचा संशय आहे.

जी महिला या मुली पुरविण्याचा काम करते तिचे तर इतर राज्यात सुद्धा जाळे असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस आता त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे.

या कारवाईमुळे नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असल्याचं उघड झालं. या महिलेकडून २ लाख ८५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून त्यात २ अमेरिकनं डॉलरचा सुद्धा समावेश आहे.

Loading...

==============================================

अंगावर काटा आणणारा VIDEO, तरुणाने एसटी खाली घेतली उडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 07:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...