उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळला, राजे अज्ञातवासात

उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळला, राजे अज्ञातवासात

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय.

  • Share this:

19 जुलै : साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलाय. 2 महिन्यांनी या याचिकेवर सुनावणी घेत हायकोर्टाने याप्रकरणी उदयनराजे भोसलेंना दिलासा द्यायला नकार दिलाय. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसले यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. याप्रकरणी 9 जणांना अटकही करण्यात आलीय. मात्र अटकेचा अंदाज आल्यामुळे राजे गेल्या चार महिन्यांपासूनच अज्ञातवासात गेलेत.

काय आहे प्रकरण?

साताऱ्यातल्या लोणंदमधे सोना अलाईज नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत उदयराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली असलेली एक माथाडी कामगार संघटना आहे. तर दुसऱ्या संघटनेचे नेतृत्त्व रामराजे निंबाळकर करतात. ही कंपनी रामराजे निंबाळकर यांच्या कामगार संघटनेला झुकते माप देते असा आरोप उदयनराजे यांनी केला.

त्यानंतर 18 फेब्रुवारीला उदयनराजेंनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घेतलं. तेथे पोहोचल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर उदयनराजे आणि सहकाऱ्यांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 01:36 PM IST

ताज्या बातम्या