डीएसकेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टात मंजूर

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन नाकारला होता.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2017 11:38 AM IST

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टात मंजूर

पुणे, 10 नोव्हेंबर: डीएसके यांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टात मंजूर झाला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन नाकारला होता.

सत्र न्यायालयाच्या निकालाविरूद्ध  प्रसिद्ध उद्योगपती डी. एस. कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती.डीएसके यांनी ठेवीदारांचे पैसे थकवल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर छापे देखील पडले.त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरूद्ध अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी कोर्टात दाखल केला होता. तो पुणे मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला. आता त्यासाठी हाय कोर्टात डीएसकेंनी धाव घेतली होती. हायकोर्टात आज डीएसकेंच्या जामीन अर्जावर झाली आहे .

दरम्यान पुण्यातील डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घेऊन लिलाव करण्याची नोटीस सेंट्रल बॅंकेनी जाहीर केली आहे.  फसवणूक,एमपीआयडीए कायद्यान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठेवीदारांच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. जवळपास नऊ महिने त्यांनी अनेक ठेवीदारांचे पैसे थकवले असल्याचा आरोप आहे. पण आपण ठेवीदारांचे पैसै परत करणार असल्याचा दावा डीएसकेंनी केला होता. तसंच आपण पैसे बुडवून पळून जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 11:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...