कोल्हापूर महापालिकेतील 20 नगरसेवकांची पद रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2018 05:11 PM IST

कोल्हापूर महापालिकेतील 20 नगरसेवकांची पद रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा दणका

कोल्हापूर, 23 ऑगस्ट : कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कोल्हापूर शहरातील तब्बल 20 नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहेत. जात पडताळणी न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने हा दणका दिला आहे. त्यामुळे नगरसेवक पद रद्द केलेल्या 20 जागांवर आता पुन्हा निवडणुका होणार का असा प्रश्न उपस्थित राहतो.

आरक्षित जागेवर निवडूण येणाऱ्या लोकप्रतिनिधींना 6 महिन्यात जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असते. पण नगरसेवकांकडून जात प्रमाणपत्राची पडताळणी न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 नगरसेवकांची पद सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहेत. या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांची कशी फसवणुक केली जाते ते उघड झालं आहे.

या नगरसेवकांची पदं रद्द

संदीप नेजदार

हसीना फरास

नियाझ खान

सचिन पाटील

दिपा मगदूम

अश्विनी रामाणे

शमा मुल्ला

गीता गुरव

अफजल पिरजादे

सविता घोरपडे

अश्विनी बारामते

स्वाती यवलूजे

किरण शिराळे

विजय खाडे पाटील

मनिषा कुंभार

सचिन पाटील

वृषाली कदम

कमलाकर भोपळे

संतोष गायकवाड

 

'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2018 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close