4 वर्षं झाली तरी दाभोळकर पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध का लागत नाही?- मुंबई हायकोर्ट

4 वर्षं झाली तरी दाभोळकर पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध का लागत नाही?- मुंबई हायकोर्ट

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होते आहे. सीबीआय आणि एसआयटीचा तपास अहवाल कोर्टात सादर करण्यात आला आहे. दाभोळकर-पानसरे प्रकरणी तपासयंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठका घेऊन ठोस कारवाई करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

  • Share this:

07 डिसेंबर:    दाभोळकर- पानसरे हत्येप्रकरणी हायकोर्टात दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान चार वर्ष झाले तरी दाभोळकर पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध का लागत नाही असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केाल आहे. तसंच या देशात पंतप्रधान आणि  संसदही सुरक्षित नाही असं वक्तव्य हायकोर्टाने  केलं आहे.  4 वर्ष उलटली तरीही अजून दाभोळकर पानसरे  यांच्या मारेकऱ्यांचा शोध अजून लागलेला नाही.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या  खंडपीठासमोर सुनावणी होते आहे.  सीबीआय आणि एसआयटीचा तपास अहवाल कोर्टात सादर करण्यात  आला  आहे.  दाभोळकर-पानसरे प्रकरणी तपासयंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठका घेऊन ठोस कारवाई करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. खुलेआम धमक्या देऊनही नंतर  लोकं छातीठोकपणे मुलाखती देत फिरतात, मग  एखाद्याचा जीव गेल्यावर ही सर्व यंत्रणा काय कामाची?  असा सवालही हाय कोर्टाने विचारला आहे.

कलाकार, विचारवंतांना पोलीस सुरक्षा पुरवणं हा या समस्येवरील उपाय होऊ शकत नाही असंही   हायकोर्टाने म्हटलं आहे. तसंच पद्मावती सिनेमाबद्दलही हायकोर्टाने आपलं मतन मांडलंय  या देशात एक सिनेमा प्रदर्शित होऊ शकत नाही? असा सवाल  हायकोर्टाने विचारला.  तसंच हल्ली निरपराध लोकांचे बळी घेणं खूप सोप्प झालंय, एखादा मोठा ट्रक गर्दीवर चालवला की झालं  अशी खंतही  हायकोर्टाने व्यक्त केली.

त्यामुळे आतातरी काही कारवाई होते का आणि मारेकऱ्यांचाा शोध लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 03:09 PM IST

ताज्या बातम्या