राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याबाबत जे घडलं त्यावर हायकमांड नाराज

राधाकृष्ण विखे - पाटील यांच्याबाबत जे घडलं त्यावर हायकमांड नाराज

डॉ. सुजय विखे - पाटील यांचा मुद्दा नीट हाताळला गेला नाही असं काँग्रेस हायकमांडचं म्हणणं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे - पाटील यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. नगरची लोकसभा जागा सोडण्यास राष्ट्रवादीनं नकार दिला आणि डॉ. सुजय विखे - पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत 'प्रत्येकाला मत स्वातंत्र्याचा, विचार स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मी राजीनामा देणार नसून हायकमांडकडे बाजू मांडेन. पवारांनी माझ्या वडिलांबाबत केलेलं विधान दु:खद होतं' असं मत राधाकृष्ण विखे - पाटील यांनी मांडलं. विखे - पाटील यांच्याबाबत जे घडलं त्यावर आता काँग्रेसचे हायकमांड नाराज असल्याचं कळतंय. सुजयच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवारांची बैठक झाली. यावेळी सुजय विखेंचा प्रश्न योग्यरितीनं न हाताळल्याबद्दल तसंच त्यांच्या भाजप प्रवेशावरून काँग्रेस हायकमांडमध्ये नाराजी आहे. सुजयचा मुद्दा व्यवस्थित न सोडवल्याची काँग्रेस हायकमांडची भावना आहे.


माढावरून राष्ट्रवादीत खदखद; विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाही?


शरद पवारांशी चर्चा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आणि आघाडीच्या जागा वाटपावर ही चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे.

राज्यात लोकसभेसाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्तापर्यंत 17 जागांवर उमेदवार घोषित केले आहे. शिवाय, काँग्रेसनं देखील काही जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. दरम्यान, उर्वरित जागांवर काँग्रेस केव्हा उमेदवार घोषित करणार? कुणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे. यंदाची निवडणूक ही दोन्ही पक्षांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे.


VIDEO: लज्जास्पद ! पुण्यात तरुणीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 19, 2019 11:00 AM IST

ताज्या बातम्या