High Alert- पुण्याच्या पवना धरणात सापडला उत्तर अमेरिकेतला 'शिकारी' मासा

हा मासा अमेरिकेतील मगरीसारखा दिसतो त्यामुळे या माश्याला 'एलिगेटर गार' असे म्हटले जाते.

News18 Lokmat | Updated On: Dec 3, 2018 06:02 PM IST

High Alert- पुण्याच्या पवना धरणात सापडला उत्तर अमेरिकेतला 'शिकारी' मासा

पुणे, ०३ डिसेंबर २०१८- उत्तर अमेरिकेत मिळणारा शाकाहारी मासा (जो इतर माश्यांना खाऊन जगतो) पवना धरणात जाळ्यात मृत अवस्थेत सापडला. हा मासा सापडल्यानंतर राज्याचे मत्स्यपालन विभाग सतर्क झाले आहे. कारण या माश्यामुळे धरणातील अन्य जीव धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मासा सुमारे १७ सेंटीमीटर लांबीचा आणि अडीच किलो वजनाचा होता. या माश्याला ‘एलिगेटर गार’ म्हणून ओळखले जाते. हा मासा अमेरिकेतील मगरीसारखा दिसतो त्यामुळे या माश्याला 'एलिगेटर गार' असे म्हटले जाते.


पवना धरणाचे सेक्शन इंजिनीअर ए.एम. गडवाल म्हणाले की, ‘एका स्थानिक मच्छिमाराने हा मासा पकडल्याचे कळल्यानंतर आम्ही मत्स्यतज्ज्ञांशी चौकशी केली असता त्यांनी हा एलिगेटर गार असल्याचे सांगितले. हा मासा पाण्यातील अन्य माशांना खाऊन जगतो. हा मासा फक्त उत्तर अमेरिकेत सापडला जातो असेही तज्ज्ञांनी सांगितले.'


मत्स्यविकास अधिकारी जनक भोसले यांनी सांगितले की, एलीगेटर गारमुळे धरणातील जैव विविधतेवर प्रतिकुल परिणाम पडू शकतो. कारण हा मासा मांसाहारी असल्यामुळे तो पाण्यातील इतर माश्यांना खाऊन जगतो.’

Loading...

धरणात हा मासा कसा आला याबद्दल बोलताना भोसले म्हणाले की, ‘कदाचीत कोणीतरी हा मासा अँक्वेरियममध्ये ठेवण्यासाठी घेतला असेल. नंतर त्याने हा मासा धरणात सोडला असेल. ’


VIDEO : पळणार नाही तर योगींसारख्यांनाच पळवून लावणार, ओवीसींचा पलटवार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 05:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...