औरंगाबाद जिल्ह्यात सापडले गुप्तधन;चांदीची नाणी आणि बरंच काही सापडल्याची चर्चा

नेवरगाव परिसरात काल एक हंडा सापडला आहे त्या हंड्यात चक्क चांदीची नाणी निघाली आहेत. इथे खोदकाम करणाऱ्या चौघांनी ती वाटून ही घेतली. मात्र म्हणतात ना गुप्त धन पचत नाही

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jan 8, 2018 10:35 AM IST

औरंगाबाद जिल्ह्यात सापडले गुप्तधन;चांदीची नाणी आणि बरंच काही सापडल्याची चर्चा

08 जानेवारी: औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात गुप्त धन सापडल्याची सध्या  जोरदार चर्चा  आहे. तालुक्यातील नेवरगाव परिसरात खोदकाम करताना एक हंडा सापडला आहे.

नेवरगाव परिसरात काल  एक हंडा सापडला आहे त्या हंड्यात  चक्क चांदीची नाणी निघाली आहेत.   इथे खोदकाम करणाऱ्या चौघांनी ती वाटून ही घेतली. मात्र म्हणतात ना गुप्त धन पचत नाही. आणि झालंही  तसंच वाट्यावरून चौघात वाद झाले. या  भांडणामुळे प्रकरण लोकांपर्यंत पोचले.   या वादाची कुणकुण पोलिसांनी लागली.  पोलीसांनी याप्रकरणी  एका चौघांपैकी एकाला बोलावून घेतले.त्याचाी चौकशा केल्यावर त्याने सगळी हकीकत पोलिसांना सांगितली  आणि  हिश्श्याची 20 चांदीची नाणीही पोलिसांना परतवली.  पोलीसांनी  घटनास्थळी जाऊन पंचनामा सुद्धा केला. मात्र चर्चा कशी थांबणार? आता या  खजान्यात अजूनही खूप काही मिळाले असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

गुप्तधन मिळण्याचीही काही पहिली वेळ नाही. या आधीही गुप्तधन मिळाल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...