News18 Lokmat

मराठा आरक्षणासाठी तिने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा

मराठा आरक्षणासाठी तरुणीने विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली गावात घडली.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2018 11:44 PM IST

मराठा आरक्षणासाठी तिने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा

उस्मानाबाद, 2 ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी तरुणीने विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली गावात घडली. तृष्णा तानाजी माने (वय १९) असे या तरुणीचे नाव आहे. ती बी-कॉमच्या द्वितीय वर्षाला होती. यापुर्वी झालेल्या मराठा मूक मोर्चामध्ये ती सहभागी झाली होती.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनांमध्ये तृष्णा सहभागी असायची. यापुर्वी झालेल्या मराठा मूक मोर्चामध्ये ती सहभागी झाली होती. सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे ती कमालीची अस्वस्थ्य होती. याच कारणातून तिने बुधवारी तीच्या राहत्या घरात विषप्राशन करून आत्महत्या केली. घडला प्रकार लक्षात येताच कुटुंबियांनी तिला रुग्णालात दाखल केले. मात्र, सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

तृष्णाच्या अशा जाण्यामुळे जिल्ह्यात संतापची लाट उसळली. मराठा आरक्षणावर निर्णय होईपर्यंत तृष्णावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. यानंतर गावात व जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर आज दुपारी 2.30 वाजता तृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा..

रिलायंस Jio आणि SBI यांची भागीदारी; ग्राहकांना मिळतील हे फायदे

Loading...

७ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलन, सकल मराठा मोर्चाचे अल्टिमेटम

आंबेनळी घाट अपघात कोणाच्या चुकीमुळे ? तपास चक्र सुरू

 

trushna tanaji mane, suicide, her life ended, poison, Maratha reservation,

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2018 11:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...