हेमंत करकरेंचे सहकारी आणि निवृत्त ACP ने उचलला साध्वी प्रज्ञासिंहच्या पराभवाचा विडा

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचे सहकारी माजी निवृत्त एसीपी रियाझ देशमुख हे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 05:03 PM IST

हेमंत करकरेंचे सहकारी आणि निवृत्त ACP ने उचलला साध्वी प्रज्ञासिंहच्या पराभवाचा विडा

औरंगाबाद, 25  एप्रिल- मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचे सहकारी आणि निवृत्त एसीपी रियाझ देशमुख हे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. रियाझ देशमुख यांनी भोपाळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रियाझ देशमुख यांनी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या पराभवाचा विडा उचलला आहे.

'मैं इन्शा अल्लाह भोपाल लोकसभा सीट के लिए फॉर्म दाखिल करूंगा, सभी दोस्तों से दुआ की दरखास्त', असे आवाहन देशमुख यांनी 21 एप्रिलला फेसबुकच्या माध्यमातून जाहीर केले होते. साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी तपास करुन प्रज्ञासिंह यांना तुरुगांत टाकले होते. त्यामुळे ती करकरेंवर जास्त काट खात असल्याचे रियाझ देशमुख यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञासिंहला पराभव करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे देशमुख म्हणाले.

हेमंत करकरे 1988 मध्ये अकोल्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यावेळी रियाझ देशमुख वाशिम पोलीस स्टेशनचे प्रमुख होते. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात करकरे शहीद झाले. तोपर्यंत देशमुख करकरेंच्या संपर्कात होते.

अमरावतीच्या गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून 2016 मध्ये रियाझ देशमुख निवृत्त झाले. तीन दशकाहून अधिक काळ पोलीस दलात सेवा दिली. निवृत्त झाल्यानंतर औरंगाबादमध्ये एक वेब पोर्टल सुरू केले. तसेच ते पोलीस कर्मचाऱ्यांना कायदेशीर सल्ला देण्याचे कामही करतात.

काय म्हणाल्या प्रज्ञासिंह

Loading...

मध्य प्रदेशमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळहून उमेदवारी दिली आणि वाद सुरू झाला. त्यातच आता साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेतली.

'हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला, असे साध्वी म्हणाल्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारले, असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने हेमंत करकरेंना माझी सुटका करण्याची विनंती केली होती. साध्वी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करावी, असे या पथकाने म्हटलं होते. पण आपल्याकडे साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबदद्ल पुरावे आहेत. त्यामुळेच मी त्यांना या खटल्यातून मुक्त करणार नाही', असे हेमंत करकरे म्हणाले होते, याची आठवण साध्वी यांनी करून दिली. तुरुंगामध्ये आपला अतोनात छळ करण्यात आला, असाही आरोप त्यांनी याआधी केला होता.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही, पक्षाने झटकले हात

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नसून त्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही. 26/11च्या हल्ल्यात जे पोलीस अधिकारी शहीद झाले ते शहीदच आहेत, असे भाजपचे  मत आहे, अशी भूमिका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मांडली. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते, असे असतानाही त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध का खटला दाखल केला नाही, असा सवाल उपाध्ये यांनी केला.

बॉम्बस्फोटात वापरलेली मोटरसायकल ही साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नावावर होती. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमध्ये मोहन भागवत यांच्या हत्येचा कटही सापडला होता. त्यावेळी भाजपचे नेते अभिनव भारतवर बंदी घालण्याची मागणी करत होते. नंतर मोदी आणि शहा आल्यानंतर परिस्थिती बदलली असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

'साध्वी प्रज्ञासिंह यांचे तोंड काळे करणाऱ्या गावाला 5 लाखांचे बक्षिस देणार'

देशासाठी आपले प्राण गमावणारे पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी व साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभा निवडणुकीत गावबंदी करून तोंड काळे करणाऱ्या गावांचा महाराष्ट्र भीम आर्मीच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याची घोषणा आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी केली आहे. प्रज्ञासिंह यांना लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपने देशातील शहीदांचा अवमान केला असल्याची टीका महाराष्ट्र भीम आर्मीने केली आहे.

आपण श्राप दिल्यामुळेच हेमंत करकरे यांची हत्या झाली, असे संतापजनक वक्तव्य प्रज्ञासिंग यांनी केले होते. 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याची भलावण त्यांनी केली होती. शहीद हेमंत करकरे यांच्यासह देशासाठी शहीद झालेल्या शहीदवीर जवानांचाही अपमान करून प्रज्ञासिंह यांनी देशविरोधी मानसिकता स्पष्ट केली आहे.


हेमंत करकरेंबद्दल साध्वींचे धक्कादायक वक्तव्य, 'त्यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सुतक संपवलं' पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 03:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...