इंजिनिअरिंगची नोकरी सोडून IPS झाले हेमंत करकरे, ऑस्ट्रियामध्येही केलं काम

इंजिनिअरिंगची नोकरी सोडून IPS झाले हेमंत करकरे, ऑस्ट्रियामध्येही केलं काम

हेमंत करकरे यांनी वर्ध्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर 1975 मध्ये ते इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी नागपूरला गेले. नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिल आणि हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड या कंपन्यांमध्येही काम केलं. पण या नोकरीत ते फारसे रमले नाहीत. त्यांना पोलीस दलात जायचं होतं.

  • Share this:

मुंबई,19 एप्रिल : मुंबई हल्ल्यातले शहीद आणि एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. हेमंत करकरे यांना माझ्यासारख्या संन्याशाचा शाप भोवला. त्यामुळे ते दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असं साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटलं आहे.

मुंबई हल्ल्यात प्राणांची बाजी लावणाऱ्या या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य केल्यामुळे देशभरातून निषेध होतो आहे. दहशतवाद्यांच्या तावडीतून मुंबईला वाचवणाऱ्या या जिगरबाज अधिकाऱ्याचा कुणालाही विसर पडू शकत नाही.

ऑस्ट्रियामध्ये 7 वर्षं

हेमंत करकरे हे त्यांच्या मृत्यूच्या 10 महिने आधी एटीएसचे प्रमुख बनले. त्याआधी ते मुंबईचे पोलीस सहआयुक्त होते. त्यांनी ऑस्ट्रियामध्ये 7 वर्षं रॉ म्हणजेच रिसर्च अॅनॅलिसिस विंगमध्येही महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.

इंजिनिअरिंग ते आयपीएस

Loading...

हेमंत करकरे यांनी वर्ध्यामध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर 1975 मध्ये ते इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी नागपूरला गेले. नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिल आणि हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड या कंपन्यांमध्येही काम केलं. पण या नोकरीत ते फारसे रमले नाहीत. त्यांना पोलीस दलात जायचं होतं. या परीक्षेसाठी त्यांनी जोरदार तयारी केली आणि 1982 ते आयपीएस झाले.

मालेगाव बॉम्बस्फोट तपास

मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एटीएसचे प्रमुख या नात्याने त्यांच्याकडे आला. याप्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली. यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचाही समावेश होता. अटक करण्यात आलेल्या लोकांपैकी बहुतांश लोक अभिनव भारत या संघटनेशी संबंधि्त होते. हे अटकसत्र राजकीय दबावामुळे करण्यात आलं, असा आरोप शिवसेनेने केला होता.

ड्रगमाफियांचं एन्काउंटर

हेमंत करकरे यांनी चंद्रपूरमधल्या नक्षलग्रस्त भागातही काम केलं होतं. नारकोटिक्स विभागात काम करताना त्यांनी परदेशी ड्रगमाफियांचं एन्काउंटर केलं होतं.

ती काळरात्र

26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री मुंबईत दहशतवादी घुसल्याची खबर हेमंत करकरे यांना कळली तेव्हा त्यांनी ड्रायव्हर आणि बॉडीगार्डसह सीएसटी स्टेशनकडे धाव घेतली. ते दहशतवाद्यांचा माग काढत स्टेशनवर पोहोचले पण तिथे कुणीच नव्हतं. त्यानंतर ते कामा हॉस्पिटलच्या दिशेने गेले. सेंट झेव्हियर्स कॉलेजच्या जवळ एका अरुंद गल्लीत अतिरेक्यांनी त्यांच्या गाडीवर एके 47 बंदुकांनी गोळीबार केला. यामध्ये हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर यांचा मृत्यू ओढवला.

कसाबला अटक

मुंबई हल्ल्यातला अतिरेकी अजमल कसाब याला अटक करण्यात हेमंत करकरे यांचं मोठं योगदान आहे. हेमंत करकरे यांच्यासह पोलीस अधिकारी जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांना सामोरे गेले म्हणूनच मुंबई दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटली.

==========================================================================

VIDEO : करकरेंबाबत वादग्रस्त विधान, न्यूज 18 च्या प्रश्नावर साध्वींचे 'हे' उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...