परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला!

परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला!

भुसावळ तालुक्यात गुरुवारी झालेल्या धुव्वाधार झालेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात कापूस, मूग, उडीद, सोयाबीनसह ज्वारीचं पीक जमीनदोस्त झालंय.

  • Share this:

जळगाव, 20 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावलीय. भुसावळ तालुक्यात गुरुवारी झालेल्या धुव्वाधार झालेल्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात कापूस, मूग, उडीद, सोयाबीनसह ज्वारीचं पीक जमीनदोस्त झालंय. कुऱ्हे पानाचे गावात हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. अगोदर पावसानं पाठ फिरवली, त्यानंतर आलेल्या पावसानं काढणीला आलेली पिकंच लोळवल्यानं पुढं काय करायचं असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढं उभा ठाकलाय.

भुसावळ भागात वादळी पावसानं पीके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. आधीच भुसावळ परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्याने अतोनात प्रयत्न करून पिके उभी केली होती मात्र अचानक झालेल्या या पावसामुळे पिकांचे मोठे कमालीचे नुकसान झाले आहे, त्यामुळे शासनाने पंचनामे करून लवकरात लवकर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून केले जात आहे.

शासनाने 61 पैसे आणेवारी लावल्यामुळे शेतकरी वर्गात शासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी लागू करावी असे शेतकरी वर्गाकडून म्हटले जात आहे. तर पीक नुकसान भरपाईसाठी महसूल पद्धत अजूनही ब्रिटिश कालीन आहे, त्यात काही प्रमाणात दुरुस्ती झाली. मात्र या कालबाह्य आणेवारी पद्धतीचा, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा हा योग्य होत नाही. अधिवेशनात, विशेष पॅकेज सरकार जाहीर करतं मात्र आणेवारी पद्धतीत काही सुधारणा करत नाही.

VIDEO : परतीच्या पावसाचा कहर; गडहिंग्लजकरांना झोडपले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 09:03 AM IST

ताज्या बातम्या