S M L

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा तयार झाला असून शनिवारी संध्याकाळी तो पूर्व किनारपट्टीवर धडकला. यामुळे राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

Updated On: Jul 22, 2018 08:06 PM IST

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, ता. २२ जुलै : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा तयार झाला असून शनिवारी संध्याकाळी तो पूर्व किनारपट्टीवर धडकला. यामुळे राज्यात बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यानं रविवारी आणि सोमवारी जोरदार पावसाचा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र शनिवारी संध्याकाळी पूर्व किनारपट्टीवर धडकल्यानं राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून,  कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्यानं रविवारी आणि सोमवारी जोरदार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मी उद्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार नाही - मुख्यमंत्री

गेल्या महिन्याभरात रविवारचा मुहूर्त साधत पाऊस सक्रिय होत असल्याचं अनेकदा दिसलंय. यावेळी पुन्हा एकदा आठवडय़ाच्या अखेरीस पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं ओडिसा आणि पश्चिम बंगाल मध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. आज विदर्भातही काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तर पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिणेला सातारा आणि औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडणार असल्याचाही अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.

शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पालघरमधील जव्हार येथे १४७ मिमी झाली. मुंबईत सांताक्रूझ येथे १८ मिमी तर कुलाबा येथे अवघा ६ मिमी पाऊस पडला.

Loading...
Loading...

हेही वाचा...

BLOG : आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी!

PHOTO - या नेत्यांना करता आली नाही विठ्ठलाची महापूजा

महाराष्ट्रासाठी अमित शहांचा 'अॅक्शन प्लान', या आहेत 16 महत्वाच्या गोष्टी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2018 08:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close