सावधान! विकेंडला घराबाहेर पडणे टाळा, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे..

मुंबईकरांने सावधान! पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे आहेत. त्यामुळे विकेंडला घराबाहेर न पडणेच बरं. मुंबईसह उपनगरात शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 08:42 PM IST

सावधान! विकेंडला घराबाहेर पडणे टाळा, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे..

मुंबई, 26 जुलै- मुंबईकरांने सावधान! पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे आहेत. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे विकेंडला घराबाहेर न पडणेच बरं. मुंबईसह उपनगरात शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतल्या दादर, माटुंगा आणि वडाळा भागातही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ईस्टर्न फ्रीवेवर पाणी भरल्याने चेंबूरकडे जाणारी वाहतूक कोंडी बोगद्यातून चेंबूरकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक ठप्प झाली आहे. जेव्हीएलआर मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. कुर्ला पश्चिमेकडील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबईत दुपारपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे भांडूप, अंधेरी, सायन परिसरात पाणी साचले आहे.

पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील शामनगर जंक्शनला दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे जेव्हीएलआर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहने अगदी संथ गतीने पुढे सरकत असल्याचे दिसून येत आहे.

या जिल्ह्यांनी Orange Alert

मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर सातारा जिल्ह्यात नारंगी इशारा (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये रविवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. तसेच पालघरमधील काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन स्थिती गंभीर होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञांनी वर्तवले आहे.

रत्नागिरीत रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे. विशिष्ठ व शिवनदीला आला पूर आला आहे. चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरले आहे. जुना बाजारपूल, मिरचा मार्केट, नाईक कंपनी भाजी मार्केट परिसरात पाणी भरले आहे. पालघरमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. हीच परिस्थिती रविवारीही उद्भवू शकते. ठाणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता शुक्रवारी आणि शनिवारी शक्यता आहे. 30 जुलैपर्यंत मुंबई आणि कोकणात पावसाची तीव्रता कायम राहू शकते. 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी हा जोर थोडा कमी होण्याचा अंदाज आहे.

Loading...

तब्बल तीन दिवस पाण्यात होती मुंबई...

26 जुलै 2005 ही दिवस मुंबईकर कधीही विसरू शकत नाहीत. त्‍या दिवसाची आठवण काढली तरी मुंबईकरांच्‍या जिवाचा थरकाप उडतो. मुंबईचे ते पावसाळी रौद्र रूप सगळ्यांनी अनुभवले आहे. तब्बल तीन दिवस मुंबई पाण्यात होती. त्या दिवसासारखी स्थिती पुन्हा मुंबईकरांवर ओढवू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह ठाणे-पालघर शुक्रवारी दुपारी धुवांधार पावसाला सुरुवात झाली.

पाण्यात नको ते धाडस करू नका, दुचाकीस्वार वाहून गेल्याचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...