Elec-widget

मुंबईकरांनो सावधान.. पुढील तीन दिवस पावसाचे, हवामान विभागाने दिला Orange Alert

मुंबईकरांनो सावधान.. पुढील तीन दिवस पावसाचे, हवामान विभागाने दिला Orange Alert

26 जुलै 2005 ही दिवस मुंबईकर कधीही विसरू शकत नाहीत. त्‍या दिवसाची आठवण काढली तरी मुंबईकरांच्‍या जिवाचा थरकाप उडतो. मुंबईचे ते पावसाळी रौद्र रूप सगळ्यांनी अनुभवले आहे.

  • Share this:

मुंबई, 26 जुलै- 26 जुलै 2005 ही दिवस मुंबईकर कधीही विसरू शकत नाहीत. त्‍या दिवसाची आठवण काढली तरी मुंबईकरांच्‍या जिवाचा थरकाप उडतो. मुंबईचे ते पावसाळी रौद्र रूप सगळ्यांनी अनुभवले आहे. तब्बल तीन दिवस मुंबई पाण्यात होती. त्या दिवसासारखी स्थिती पुन्हा मुंबईकरांवर ओढवू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह ठाणे-पालघर शुक्रवारी दुपारी धुवांधार पावसाला सुरुवात झाली.

मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नारंगी इशारा(Orange Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये रविवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. तसेच पालघरमधील काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन स्थिती गंभीर होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञांनी वर्तवले आहे.

पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट..

पालघर जिल्ह्यासाठी शुक्रवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. हीच परिस्थिती रविवारीही उद्भवू शकते. ठाणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता शुक्रवारी आणि शनिवारी शक्यता आहे. 30 जुलैपर्यंत मुंबई आणि कोकणात पावसाची तीव्रता कायम राहू शकते. 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी हा जोर थोडा कमी होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गुरुवारीही मुंबईकरांनी जोरदार पावसाचा अनुभव घेतला. गुरुवारी रात्री पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. मात्र, शुक्रवारी सकाळी हा जोर पुन्हा वाढला आहे. ठाणे, नवी मुंबईमध्ये मात्र गुरुवारी दिवसभरात नौपाडा, दौलत नगर, मुंब्रा, कोपरखैरणे येथे 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. भांडुपमध्येही 40 मिलीमीटरहून पावसाची नोंद झाली.

Loading...

VIDEO: मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक, गार्डच्या डोक्याला गंभीर दुखापत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 04:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...