S M L

विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, परतीचा पाऊस दणका देणार ?

नागपूरसह संपूर्ण विदर्भात 21 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Updated On: Sep 21, 2018 09:03 AM IST

विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, परतीचा पाऊस दणका देणार ?

नागपूर, ता. 20 सप्टेंबर : नागपूरसह संपूर्ण विदर्भात 21 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे विदर्भात 21 सप्टेंबर शुक्रवारला अतिवृष्टीची शक्यता आहे. 21 तारखेनंतर नंतर मात्र अशी कुठलीही भीती नाही. अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ ए.डी ताठे यांनी दिली आहे.

विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला असला एकूण विदर्भात सरासरीपेक्षा 9 टक्के पाऊस कमी पडला आहे. परतीच्या पावसाने ही सरासरी भरून निघेल अशी शक्यता शेतकऱ्यांना वाटत होती मात्र हा पाऊस तेवढा नसेल असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. अतिवृष्टीचा अंदाज असला तरी काळजीचं कारण नाही हा पाऊस मुसधार स्वरूपाचा असेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

विदर्भात ऑगस्ट महिन्यामध्ये काही दिवसांमध्ये एवढा पाऊस झाला की शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आणि प्रचंड नुकसान झालं होतं.गुरूवारी 20 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज मध्ये मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस एवढा जास्त होता की मुख्य बाजारपेठेत गुडघाभर पाणी भरलं आणि भाजीपाला गेला. शहरातल्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालं, नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

 

VIDEO : परतीच्या पावसाचा कहर; गडहिंग्लजकरांना झोडपले

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 09:03 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close