पाऊस आला धावून आणि पूल गेला वाहून

जोरदार पावसाने पुलाच्या भोवती पाणी साचलं आणि पूला भोवतीचा भराव वाहून गेला. या मुळे तालुक्यातून बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा एकमेव मार्ग बंद झालाय.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 08:49 PM IST

पाऊस आला धावून आणि पूल गेला वाहून

जालना 28 जून : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भोकरदन तालुक्यातील विरेंगाव चा अर्धवट बांधलेला पूल वाहून गेला. या मुळे तालुक्यातून बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा एकमेव मार्ग बंद झालाय. सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसाने या पुलाच्या भोवती पाणी साचल्याने पूला भोवतीचा भराव वाहून गेला. तर संततधार असल्याने पारधच्या रायघोळ नदीला दुसऱ्यांदा पूर आलाय, या पुरामुळे आजूबाजूच्या शेतात पाणी शिरलंय. तर रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलं. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या गावकऱ्यांसाठी पाऊस धावून आला मात्र आल्यानंतर पूल घेऊन गेलाा अशी प्रतिक्रिया आता गावकरी व्यक्त करताहेत.

अनेक रेल्वे गाड्या रद्द

जोरदार पाऊस आल्याने मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये पैसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काही एक्सप्रेस च्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

गाड़ी क्रमांक 51154 अप भुसावल मुंबई पॅसेंजर 29/06/2019 आणि 30/06/2019 ला रद्द करण्यात आली आहे.

गाड़ी क्रमांक  51153 डाउन मुंबई भुसावळ पॅसेंजर 30/06/2019 आणि 01/07/2019  ला रद्द करण्यात आली आहे.

Loading...

गाड़ी क्रमांक 11025 अप भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस 29/06/2019 आणि 30/06/2019 ला सुटणारी गाडी व्हाय मनमाड दौड़ मार्गाने पुणे स्टेशनला पोहचणार आहे.

गाड़ी क्रमांक 11026 डाउन  पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस  29/06/2019 आणि 30/06/2019  ला सुटणारी गाड़ी व्हाय  दौड़ मनमाड मार्गाने भुसावळला पोहोचणार आहे.

पेरणी सुरू असतानाच वीज पडली, दोन शेतकरी ठार

पेरणी करत असताना दोघांचा मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे घडलीय. 17 वर्षीय कपिल शेगोकर आणि 55 वर्षीय बाळू उमाळे असं मृत झालेल्या दोघांची नाव आहेत. दोन तीन दिवसांपासून पावसाने अकोला जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी सुरवात केली. बाळापूर तालुक्यातही पेरण्या सुरू झाल्या आहेत.

बाळापूर तालुक्यातील बोराळा शेतशिवारात दुपारच्या वेळी पेरणी सुरू असताना, विजेच्या कडकडाटात ढग दाटून आले. यावेळी शेतात पेरणी करत असलेल्या बाळू उमाळे आणि कपिल शेगोकर यांच्या अंगावर वीज कोसळली, यात ते दोघेही गंभीर भाजल्या गेले. दोघांनाही तातडीने अकोल्यातील सरोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2019 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...