दीड तास धो धो बरसला आणि कवठे येमाईतला दुष्काळ हटला

दीड तास धो धो बरसला आणि कवठे येमाईतला दुष्काळ हटला

गेल्या 50 वर्षात असा पाउस झाला नाही अस शेतकरी सांगतायेत. यामुळे शेतकरी सुखावले असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

  • Share this:

रायचंद शिंदे, पुणे, 27 जून : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या कवठे येमाई परीसरात गुरुवारी सायंकाळी दीड तास तुफानी पाउस झाला.गेल्या 50 वर्षात असा पाउस झाला नाही अस शेतकरी सांगतायेत. यामुळे शेतकरी सुखावले असून ओढे नाले तुडुंब भरून वाहिले तर घोडेवस्ती दत्त ओढ्यावरील पुलावरुन पाणी गेल्याने मलठण - कवठे वाहतुक दिड तास बंद होती. परिसरातील नागरिकांनी या ओढ्यावर आलेल्या पुलाचं पाणि पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वादळाने विद्युत खांब पडल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला. दिड तासात पाण्याचा दुष्काळ हटला. खरीपातील शेती मशागतीस यामुळे सुरुवात होणार आहे.

आंबेगाव तालुक्यातही ढग फुटी?

पुणे जिल्ह्यतील आंबेगाव तालुक्यातील पेठ,पिंपळगाव(खडकी)येथे गुरुवारी सायंकाळी ढग फुटी सारखा पाऊस पडला आहे.यामुळे ओढ्याना मोठा  पूर आला.जमिनीचे  बाध फुटले जाऊन नुकसान झालेl. पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली असून शेतातील बांध वाहिल्याने व पिके वाहून गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्त्यावरून वेगात वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे. ढगफुटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रशासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने युवासेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी केली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्या पासून बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात होता मात्र पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्याचे सर्वत्र टंचाई झाली होती मात्र आज गुरुवारी झालेल्या पावसाने एका महिन्याची भरपाई भरून काढली असून ओढे, नाले,बंधारे तुडुंब भरले आहेत,तर काही परिसरात या पावसाने मोठे नुकसान केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 09:35 PM IST

ताज्या बातम्या