पावसाचा पुन्हा दणका, मुंबई, कोकणात मुसळधार

या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्वच भागात पाऊस पुन्हा सक्रीय होईल असा इशारा हवामान खात्याने दिलाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 05:23 PM IST

पावसाचा पुन्हा दणका, मुंबई, कोकणात मुसळधार

मुंबई 24 जुलै : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कोकण आणि मुंबईत पुन्हा दमदार आगमन केलंय. मंगळवारी रात्रीपासून मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं. मात्र पश्चिम आणि मध्ये रेल्वेवरची वाहतूक थोडी विलंबाने असली तरी सुरळीत सुरू आहे. तर कोकणात मुसधार पावसाने अनेक नद्यांना पूर आलाय. पुढच्या काही दिवसांमध्ये अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात  शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

मुंबई

मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मेट्रोची कामं सुरू असल्यानं पाणी साचण्याचं प्रमाण वाढलंय. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशीराने मात्र सुरळीत सुरू असल्याने हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला. दादर, अंधेरी, परळ, सायन इथल्याही काही भागांमध्ये पाणी साचलं होतं.

प्रवाशांना खूषखबर, ST बसचं आरक्षण आता 60 दिवस आधी मिळणार

ठाणे

Loading...

गाजावाजा करत फोटोग्राफी करत ठाण्यातील गटर आणि वाले सफाई 70 टक्क्यांपेक्षा जास्त झालीये असा दावा ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला होता मात्र त्यांच्या या दाव्याची हवा निघाली असून चक्क ठाणे महानगर पालिका परीसरातच 1 ते 2 फुट पाणी साचलंय. यामुळे नक्की कुठे नाले गटर सफाई केली? किती पैसे या गटरात नाल्यात घालवले असा संतप्त सवाल ठाणेकर विचारताहेत. आज सकाळ पासून ठाण्यात पावसाने हजेरी लावली मात्र दुपार पासून पाऊल धो धो कोसळू लागला आणि या पावसाने ठाणे मनपाची पोलखोल केलीये. ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयाच्या मागील बाजूस रस्त्यावर 1 ते दीड  फूट पाणी साचलय. यातून नागरिक आपली वाट काढत जात आहेत. तर गाड्या चालवताना ठाणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

अभ्यासात जिंकली पण परिस्थितीने हरवलं, फी न भरता आल्याने 89 टक्के मिळवणाऱ्या तरुणीची आत्महत्या

भिवंडी परिसरात पावसाचा जोर वाढल्याने  शहरातच पूरस्थिती निर्माण झालीय. शहरातील तिनबत्ती बाजारपेठेतील सुमारे दिडशे पेक्षा जास्त दुकानांमध्ये पाणी शिरले असून व्यापाऱ्यांना भाजीपाला फेकून द्यावा लागला. पद्मानगर भागात मोठ्या प्रमाणावर घरांमध्येही पाणी घुसलं होतं. कल्याण नाक्यावर मोठ्या प्रमाणात पाणी सचल्याने नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

कोकण

रत्नागिरीतल्या फुणगूस प्रमाणे मिरजोळे गावातही भूस्खलन झालय. 2006 मध्येही या भागात भूस्खलन झालं होतं. त्यानंतर इथे धूपप्रतिबंधक बंधाराही बांधण्यात आला होता. मात्र या बंधाऱ्याच काम निकृष्ट झाल्यामुळे आता पुन्हा एकदा इथे भूस्खलन झालय. त्यामुळे आजूबाजूची  शेती धोक्यात आलीय.

ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड, डॉक्टरांचं कामबंद आंदोलन

रत्नागिरी जिल्ह्यातही आज सकाळी पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे, जिह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, मंडणगड तालुक्यातील भारजा आणि सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर दापोली तालुक्यातील  बांधतीवरे, कोडजाई, या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2019 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...