कोल्हापूरला रात्री पावसानं झोडपलं

कोल्हापूरला रात्री पावसानं झोडपलं

पावसामुळे काही घरात, दुकानात पाणी शिरले. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

  • Share this:

कोल्हापूर, 14 सप्टेंबर : कोल्हापूर शहराला काल रात्री पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. रात्री १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान एका तासात तब्बल ३३ मि.मी. पावसाची नोंद झालीय. पावसामुळे काही घरात, दुकानात पाणी शिरले. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

तर फलटण पूर्व भागात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फलटण-आसू रस्त्यावरील गोखळी आणि चव्हाणपाटी इथले पूल पाण्याखाली गेले होते. मध्यरात्रीपासून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

तसंच बारमतीतही रात्री तब्बल साडेचार तास पडत असलेल्या पाऊस सकाळी ओसरला आहे. परंतु अजूनही काही रस्ते पाण्याखाली आहेत तर नागरिकांना आपली वाहने पाण्यातून घेऊन जावी लागतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 10:32 AM IST

ताज्या बातम्या