S M L

गडचिरोलीमध्ये मुसळधार, शंभर गावं संपर्कहीन

गडचिरोली सततच्या पावसामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. शंभर गावं संपर्कहीन झालीयत.

Sonali Deshpande | Updated On: Jul 19, 2017 11:59 AM IST

गडचिरोलीमध्ये मुसळधार, शंभर गावं संपर्कहीन

19 जुलै : गडचिरोली सततच्या पावसामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.  शंभर गावं संपर्कहीन झालीयत.  पर्लकोटा नदीवरील मोठा पुल पाण्याखाली गेलाय. तर  पुराचं पाणी भामरागडमध्ये शिरलंय.

आरमोरी तालुक्यात विलोचना नदीला पूर आलाय. त्यामुळे आरमोरी देलनवाडी मार्ग बंद झालाय.  या भागातल्या पंधरा गावांचा संपर्क तुटलाय. चामोर्शीत मुसळधार पावसामुळे गावतलाव फुटला.  पाणी लगतच्या काही घरात जाण्याचा धोका निर्माण झालाय.  अजूनही पाऊस सुरूच आहे.

वर्ध्या जिल्ह्यात रात्री सुरू  झालेला मुसळधार  पाऊस असाच सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने नदीनाल्यांना पूर आला असून यशोदा नदीला आलेल्या  पुरामुळे राळेगाव - नागपूर राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तसंच चणा टाकळी - सरुळ मार्गावरील पूल वाहून गेल्याने टाकळीचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.जिल्ह्यात पहिल्याच झालेल्या जोरदार पावसाने झोडपल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलाय.  जिल्ह्यातील तब्बल 31 बंधारे गेले. राधानगरी व गगनबावड्यात अतिवृष्टीची नोंद झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 10:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close