मुसळधार पावसाचा दरोडेखोरांना फायदा, दुकानांवर डल्ला मारून लाखोंचा माल लंपास

मुसळधार पाऊस असला तरी बेसावध न राहता काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. एकाच रात्रीत चार दुकानात चोरी झाल्याने शहरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडालीय.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 04:06 PM IST

मुसळधार पावसाचा दरोडेखोरांना फायदा, दुकानांवर डल्ला मारून लाखोंचा माल लंपास

अनिस शेख, देहू 30 जुलै : देहूरोड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पडणाऱ्या पावसाचा चोरांनी चांगलाच फायदा उचलला आहे. पावसामुळे रस्त्यावर गस्त घालणारे पोलीस तसेच बाजारपेठेची रखवाली करणारे वॉचमेन फिरकले नसल्यानं चोरट्यांनी चार दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय.

देहूरोड बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेले उजाला इलेक्ट्रॉनिक्स, रतन मेडिकल, कुमार ड्रेसेस ,तसेच संजय मेटल या दुकानात चोरट्यांनी आपला हात साफ केलाय. विशेष म्हणजे कुठल्याही अवजाराचा उपयोग न करता चोरट्यांनी मोठ्या शिताफीने दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करत लाखो रुपयाचे मोबाइल तसेच इतर दुकानातून महागडे साहित्य लंपास केले.

शाळा सोडली पण छेडछाड थांबली नाही, 10 वीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

इलेक्ट्रॉनिक्स शो रूम मध्ये लावण्यात आलेल्या  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरांची हात सफाई स्पष्टपणे कैदी झाली. एकाच रात्रीत चार दुकानात चोरी झाल्याने शहरातील व्यापारी चांगलेच भयभीत झाले आहेत. देहूरोड पोलिसांनी चारही दुकानातील चोरीला गेलेल्या वस्तूंचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही कॅमेरे च्या आधारे दोन चोरांचा शोध सुरू केलाय.

मुसळधार पाऊस असला तरी बेसावध न राहता काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही आता जास्त सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

Loading...

नदीच्या प्रवाहात 100 सिलेंडर्स गेले वाहून

कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. संतधार पावसाने रस्तेही निसरडे झाले आहेत. जिल्ह्यातल्या आजरा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ट्रक नदीवरच्या पुलाला धडकला. यात ट्रकचा भाग पुलाकडे झुकला गेला. या ट्रकमध्ये सिलेंडर होते. अपघातातमुळे ट्रकमधे सगळे सिलेंडर नदीत पडले. पावसामुळे नदीच्या पाण्याला वेग होता. त्यामुळे पाण्यात सगळीकडेच सिलेंडर दिसून लागल्याने एकच खळबळ उडाली.

हा ट्रक कोल्हापूरकडे जात असताना व्हिक्टोरिया पुलावर हा अपघात झाला. वेगात असलेला ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला. त्यामुळे सगळे सिलेंडर नदीच्या पाण्यात पडले. हे सिलेंडर रिकामे असल्याने मोठा अनर्थ टळला. सिलेंडर रिकामे असल्याने ते नदीच्या पाण्यात तरंगू लागले.

राज्य सरकारची नवी योजना, 10 लाख नोकऱ्या होणार उपलब्ध

या सिलेंडरमध्ये जर गॅस असता तर मोठा अनर्थ घडला असता. अपघातामुळे अशा सिलेंडरचा स्फोट होण्याची शक्यताही असते. या घटनेची माहिती कळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. सर्व रिकामे सिलेंडर गोळा करण्याचं काम सुरू आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे सिलेंडर्स विविध ठिकाणी जाऊन अडकले आहेत. तर काही सिलेडंर्स प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत.

गाडीतून खाली पडलेले सर्व सिलेंडर्स पुन्हा जमा करणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 04:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...