नालासोपारा, 25 जुलै: नालासोपाऱ्यात गणपतीच्या कार्यशाळेत पाणी शिरलं. त्यामुळे शेकडो गणेशमूर्ती पाण्यात बुडाल्या. स्वत:च्या हातांनी घडवलेल्या गणेशमूर्ती अनंत चतुर्दशी आधीच अशा पाण्यात आणि तेही साचलेल्या पाण्यात बुडलेल्या बघून मूर्तिकाराला अश्रू अनावर झाले. नालासोपाऱ्यातील चंदननाका परिसरातल्या या कार्यशाळेत सध्या हजारो गणेशमूर्ती तयार होत आहेत. मात्र बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बाप्पाला असं गणेशोत्सवाआधीच पाण्यात बुडण्याची वेळ आली आहे.