अकोलासह चंद्रपुरही हॉट..मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद, पारा 47.2 अंशांवर

संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. अकोला आणि चंद्रपूरात रविवारी मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या दोन्ही शहरात आजचा पारा 47.2 अंशांवर पोहोचला. शनिवारी अकोल्यात तापमान 46.7 अंश सेल्सिअस होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2019 08:14 PM IST

अकोलासह चंद्रपुरही हॉट..मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद, पारा 47.2 अंशांवर

पुणे, 28 एप्रिल- संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. अकोला आणि चंद्रपूरात रविवारी मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या दोन्ही शहरात आजचा पारा 47.2 अंशांवर पोहोचला. शनिवारी अकोल्यात तापमान 46.7 अंश सेल्सिअस होते.

दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजेच्या गडगडाटासह पाऊसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. शनिवारी कोल्हापरात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला होता.

मागील सहा दिवसांत तापमान 39 अंशांवरून 45 अंशांपेक्षा जास्त झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थीतीमुळे विदर्भ चांगलाच होरपळला आहे. जगातील सर्वात उष्ण अशा पंधरा शहरांपैकी सहा शहरे विदर्भातील आहे. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 46.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जगातील 15 सर्वात उष्ण शहरांत विदर्भातील 6 शहरांचा समावेश आहे. दुसरीकडे, राज्यातही उष्णतेची लाट तीव्र झाल्याने कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर पोहोचला आहे. परभणीत तापमानात मोठी वाढ झाली आहे. पारा 45 अंशांवर आहे.

आठ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार

महाराष्ट्रासह देशांतील विविध राज्यांत येत्या आठ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आण गुजरात आणि मध्य महाराष्ट्रावर सध्या जास्त दाबाचा पट्टा आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील तापमानामध्ये सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

Loading...

– एस. एल. साहू, डायरेक्टर जनरल, प्रादेशिक हवामान खाते.


जगातील सर्वात उष्ण शहरात विदर्भातील सहा शहरे...

1) अकोला – 2

2) ब्रम्हपुरी – 3

3) वर्धा – 5

4) चंद्रपूर - 6

5) अमरावती - 7

6) नागपूर - 8

ताडोबातील वन तलावात 9 पक्षांचा मृत्यू

वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या झळा या मनुष्यांसोबतच पशु पक्षांनाही बसताहेत. ताडोबातील वन तलावात उन्हामुळे 9 पक्षांचा मृत्यू झालाय तर नागपुरच्या अंबाझरी तलावातील हजारो मासेही प्रदुषणासोबतच वाढत्या तापमानामुळे मृत्यूमुखी पडले आहे. पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्याने उष्णता वाढली.

- कौस्तव चँटर्जी, पर्यावरण वादी.

'विदर्भ तापत असतांना त्यात उष्णतेत आणखी वाढ करण्यासाठी सरकारच हातभार लावत असल्याचा आरोप पर्यावरण वाद्यांनी केला आहे. लहानमोठे असे 250 कोळशावर आधारीत वीज निर्मिती प्रकल्प असणाऱ्या विदर्भात नागपुरच्या विदर्भात आणखी दोन औष्णिक वीज केंद्र राज्य सरकारने मंजूर केले आहे.'

- सुधीर पालीवार, विदर्भ एन्व्हायरमेंट प्रोजेक्ट


पाण्यासाठी जीवाची बाजी, दुष्काळाचं भयाण वास्तव दाखवणारा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 08:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...