HEAT WAVE : उन्हाचा कहर! विदर्भ - मराठवड्यात पुढचे 3 दिवस धोकादायक

बहुतांश ठिकाणी पारा 46 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणं टाळावं, असा इशारा देण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 03:10 PM IST

HEAT WAVE : उन्हाचा कहर! विदर्भ - मराठवड्यात पुढचे 3 दिवस धोकादायक

नागपूर, 30 मे :  विदर्भात तापमानाचा पारा कमी होण्याचं नाव घेत नाही, त्यातच आता उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात आलेली उष्णतेची लाट पुढचे 3 दिवस कायम राहणार असल्याचं वेधशाळेनं सांगितलं आहे. बहुतांश ठिकाणी पारा 46 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडणं टाळावं, असा इशारा देण्यात आला आहे.

चंद्रपूरमध्ये उष्णतेचा कहर आहे. तापमान 48 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. नागपुरातही पारा 47 अंशांच्या पुढे गेला आहे. गपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. निम्म्यापेक्षा जास्त विदर्भात 46 अंश तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. मागील आठ दिवसांत तापमान 39 अंशांवरून 45 अंशांपेक्षा जास्त झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमुळे विदर्भ चांगलाच होरपळला आहे. जगातील सर्वात उष्ण अशा पंधरा शहरांपैकी सहा शहरे विदर्भातील आहे.

गेल्याच आठवड्यात अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 46.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जगातील 15 सर्वात उष्ण शहरांत विदर्भातील 6 शहरांचा समावेश आहे. दुसरीकडे, राज्यातही उष्णतेची लाट तीव्र झाल्याने कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर पोहोचला आहे.

VIDEO: चंद्रपूर, अमरावतीत उष्णतेची लाट, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडींचा आढावा

SPECIAL REPORT: मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कुणाला संधी?

Loading...

मे महिना संपत आला असला तरी उन्हाचा कडाका काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट दररोज तापमान वाढतच आहे. नागपूरात मंगळवारचं तापमान तब्बल 47.5 डिग्री सेल्सिअसवर गेलं. गेल्या 20 वर्षातलं हे सर्वात जास्त तापमान आहे. यापुर्वी  सर्वात जास्त 47.9 डिग्री एवढं तापमान नोंदविलं गेलं होतं. ग्लोबल वार्मिंग आणि ग्रीन हाऊस गॅसेस मुळे तापमान वाढत आहे. नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

विदर्भात उन्हाळ्यात तापमान जास्तच असते. दरवर्षी त्यात वाढ होतेय. सकाळी 8 पासूनच उन्हाचा कडाका जाणवायला लागतो. रात्री 12 नंतरही हवेत उष्णता कायम राहते. पहाटे पहाटे वातावरण थोडं थंड होतं मात्र सूर्योदय होताच वातावरण तापायला लगातं. वातावरण एवढं गरम असतं की एसीही काम करत नाहीत. शहरात उष्माघाताचं प्रमाण वाढत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

त्यात मान्सूनही लांबण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेनं अंगाची काहिली होणार हे निश्चित!

राज्यात पाडणार कृत्रिम पाऊस

राज्यात पाऊस उशीरा येणार असल्याचं हवामान खात्याने सांगितल्याने राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत टेंडर काढलं जाईल त्यानंतर काम दिलं जाईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. या प्रयोगासाठी 30 कोटी खर्च अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं. धरण क्षेत्रात पाऊस पडण्याचा अधिक प्रयत्न केला जाणार आहे. मराठवाडा - विदर्भ भागातील अवर्षणग्रस्त भागातही हे प्रयोग केले जातील. सोलापूरमध्ये एक रडार याआधीच उभारण्यात आले आहे त्याचीही मदत होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

नागपुरातलं तापमान आता पन्नाशी गाठण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. शहरातील तापमानाचा पारा आता 47 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. वातावरणातील उष्मा प्रचंड वाढल्यानं नागरिकांना दिवसा घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. नागपुरात गेल्या 48 तासांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दहाही जणांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्युमागील नेमकं कारण स्पष्ट होऊ शकणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 03:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...