उष्णतेचा पारा आणखी वाढणार, काळजी घ्या !

उष्णतेचा पारा आणखी वाढणार, काळजी घ्या !

राज्याच्या काही भागामध्ये आठवड्यांमध्ये हलक्या पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातच उष्णतेची लाट कायम असल्याने बहुतांश ठिकाणचा पारा ४० अंशांपर्यंत आहे.

  • Share this:

07 मे : पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमानामध्ये मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरूच आहे. ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले तापमानात सध्या किंचितशी घट झाली असली, तरी येत्या काही दिवसांत त्यात पुन्हा वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राज्याच्या काही भागामध्ये आठवड्यांमध्ये हलक्या पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातच उष्णतेची लाट कायम असल्याने बहुतांश ठिकाणचा पारा ४० अंशांपर्यंत आहे. त्यामुळे गरमीच्या आणि उन्हाच्या तडाख्याचा नागरिकांना मनस्तापच होतोय.

या वाढत्या उष्णतेचा आरोग्याला मोठा धोका आहे. त्यामुळे गरमीच्या दिवसांत जास्त पाणी प्या, डोक्यावर टोपी घालून रहा, लिंबू सरबत, किंवा ठंड फळांचा आहार असू द्या. त्याने उष्णतेचा त्रास होणार नाही.

उत्तर भारत, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे शहरातील कमाल तापमानात वाढ होत आहे. पुढील काही दिवसांत शहर आणि परिसरातील किमान तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2018 08:15 AM IST

ताज्या बातम्या