S M L

मराठा आरक्षणा संदर्भात उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात उमटलेल्या हिंसक आंदोलनांची दखल घेत मुंबई हायकोर्टात उद्या मराठा आरक्षणा संदर्भात सुनावणी होणार आहे.

Updated On: Aug 6, 2018 11:31 PM IST

मराठा आरक्षणा संदर्भात उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी

मुंबई, 6 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात उमटलेल्या हिंसक आंदोलनांची दखल घेत मुंबई हायकोर्टात उद्या मराठा आरक्षणा संदर्भात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यभरातील आंदोलनांची बाब कोर्टाच्या नजरेस आणून दिली आहे, तसेच आत्तापर्यंत सात तरूणांनी आत्महत्या केल्याचीही माहीती पाटील यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली होती. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने उद्या या प्रकरणाची सुनावणी घ्यायचं ठरवलंय. हायकोर्टानं राज्य सरकारला ३१ जुलैपर्यंत राज्य मागासप्रवर्ग आयोगानं केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात डिसेंबर २०१७ मध्ये दाखल करण्यात आलीय. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे यावर उद्या सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक महिन्यांपासून मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. याबाबत अद्याप कुठलंही ठोस काम दिसत नसल्याने आयोगाने व राज्य सरकारने तात्काळ व वेळमर्यादेच्या आत पडताळणी करून मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने लावावा व त्याकरिता वेळ मर्यादा ही उच्च न्यायालयाने निश्चित करावी जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आलीय.

मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर बाबी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार - मुख्यमंत्री

मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणार, सर्वांचे हित जपूनच मेगाभरती करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच लोकशाहीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष बदनाम होतो. कोवळी तरूणाई आत्महत्या करते, यामुळे मनाला अतिशय वेदना होतात त्यामुळे आत्महत्या करू नका चर्चेला या मी तुमच्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्र ढवळून निघालाय. आरक्षणासाठी एकापाठोपाठ तरुणांनी आत्महत्या केल्या त्यामुळे मराठा आंदोलन चिघळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सह्याद्री वाहिनीवरुन थेट जनतेशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी सरकारने किती प्रयत्न केले याचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचला.

Loading...

मराठा आरक्षणासाठी सरकार देण्यासाठी तयार आहे मात्र सुप्रीम कोर्टात न्यायिक बाजू टिकवून ठेवण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहे. राज्य मागास आयोगाला मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे. हा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलावले जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार आहे. ज्यामुळे कोर्टात सरकाराला बाजू लावून धरता येईल अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

तसंच संवेदनशील नेत्यांनी नेतृत्त्व करणे सोडले तर संपूर्ण समाज दिशाहिन होईल. मार्ग संवादातून निघणे शक्य. सरकार संवादासाठी सदैव तयार, कटिबद्ध आहे. हा प्रश्न राजकारणात अडकविण्याचा नाही, प्रतिस्पर्धेसाठी वापरण्याचा नाही. असे झाले तर महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही. आता राजकीय कुरघोडी करण्याऐवजी या व्यवस्थेचे एक घटक म्हणून एकत्रित येऊन या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. हे आवाहन गांभीर्याने घेऊन, संवादाची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केलं.

 

हेही वाचा..

शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार 14 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता

VIDEO : तीन वर्षाच्या चिमुकलीसह ती रेल्वे रूळावर जाऊन झोपली

18 हजार पगार घेणारा निघाला 20 कोटीचा मालक!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 11:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close