S M L

गाडी चालवायच्या हौसेपोटी त्याने चोरल्या दुचाकी आणि रिक्षा!

Updated On: Oct 11, 2018 06:22 PM IST

गाडी चालवायच्या हौसेपोटी त्याने चोरल्या दुचाकी आणि रिक्षा!

गणेश गायकवाड, उल्हासनगर, ११ आॅक्टोबर : हौसेला मोल नसते असं म्हटलं जातं मात्र याच हौसे पोटी तब्बल १० मोटारसायकल चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी या दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला साथीदारांसह बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी बेन्सन मोतीस याला वेगवेगळ्या मोटारसायकल चालवण्याची मोठी हौस होती. मात्र ही हौस भागवण्यासाठी दुसऱ्याच्या पार्क करून ठेवलेल्या मोटारसायकल तो घेऊन जायचा आणि पेट्रोल संपताच तो त्याच ठिकाणी ठेऊन पोबारा करायचा.

बेन्सन याने आपल्या एका साथीदारांच्या मदतीने परिमंडळ चारच्या विविध शहरातून तब्बल १० मोटारसायकल आणि एक रिक्षा चोरली.मात्र काही दिवसांपूर्वी एका मोटारसायकल चोरीचा तपास करतांना चोरीला गेलेली मोटारसायकल घेऊन दोन जण एका ठिकाणी आल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसाना मिळताच सापळा रचून त्यांनी या दोघांना अटक केली.

त्याच्याकडून ५ लाख ४० हजार किमतीच्या १० मोटारसायकल आणि एक रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. आता या मोटारसायकल चालवणाऱ्या शौकिनांची रवानगी थेट पोलीस कोठडीत झाली आहे.

===============================================================

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 05:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close