जळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर!

अंत्यत गरिब कुटुंबातील महिला असून दररोज मोल मजुरी केल्याशिवाय पोट भरत नाही अशी अवस्था होती. गरिब महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 14, 2018 07:48 PM IST

जळण गोळा करणाऱ्या महिलेवर उलटला उसाने भरलेला ट्रॅक्टर!

 विरेंद्र उत्पात,14 नोव्हेंबर : पंढरपूर येथील मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथे लक्ष्मीबाई राम कदम(४२) या महिलेचा उसाचा ट्रॅक्टर ट्रेलर ( एमएच ४५ एफ ६६६९)अंगावर पडल्याने महिलेचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला. हा ट्रॅक्टर भैरवनाथ शुगर लवंगी या कारखान्याला ऊस घेऊन जात होता.

  मृत महिला घराशेजारील काटेरी जळणगोळा करीत असताना ट्रॅक्टर चालकाचा  वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रेलर पलटी झाल्याने महिला उसाखाली सापडली. यात महिलेचा  गुदमरुन जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास  कदमवस्ती जवळील वळणावर घडली. ट्रेलर पलटी झाल्यानंतर वाहनचालकाने पळ काढला. त्यामुळे चालक कोण होता हे समजू शकले नाही.

  अंत्यत गरिब कुटुंबातील महिला असून दररोज मोल मजुरी केल्याशिवाय पोट भरत नाही अशी अवस्था होती. गरिब महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. घडलेली घटना ही चालकाच्या बेजबाबदारपणामुळे तसेच खराब रस्तामुळे घडली असून जोपर्यंत ठोस आश्वासन आणि भरपाई मिळत नाही तोवर प्रेत स्वीकारण्यास नातेवाईकांनी नकार दर्शवला.

Loading...

घटनास्थळापासून कारखाना केवळ ३ किमी अंतरावर आहे. परंतु घटना घडून ३ते४ तास उलटूनही एकही पदाधिकारी फिरकला नाही. नैतिकता म्हणून का हाईना कारखान्यांची व्यक्ती घटनास्थळी यायला हवी होती. परंतु, घटना घडून ३ ते ४ तास झाले तरही कोणीही फिरकले नाही असा आरोप स्थानिकांनी केला. घटना घडल्यानंतर वाहनचालकाने पळ काढला परंतु त्याच्या सोबत कारखान्याकडे जाणारे इतर ट्रॅक्टरचे चालक ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असल्यानेच गाडीवरचा ताबा सुटला असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

  भैरवनाथ साखर कारखान्याकडे जाणारा रस्ता अंत्यत अरुंद असून एकाच वेळी दोन वाहने जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे. रस्ता अंत्यत खराब आहे. धुळीचे साम्राज्य रस्त्यावर जास्त असते. त्यामुळे किरकोळ घटना सतत घडत होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेर या रस्त्याने महिलेचा बळी घेतला. अशा अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर कारखाना आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला.

   घटना घडल्यापासून लवंगी कारखान्याकडे जाणारे सर्व ऊस वाहनांना अडविण्यात आले होते. सकाळी ८ ते संध्या ८पर्यंत ऊस वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. कारण सलगरला शाळेला जाणाऱ्या विद्यार्थांची संख्या जास्त आहे. म्हणून सकाळी ८ते संध्या८पर्यंत वाहतूक बंद करण्याची मागणी केली जात आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 07:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...