S M L

एचडीएफची बँकेचे सिद्धार्थ सिंघवी यांची हत्या, गुढ उलगडणार?

गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे अधिकारी सिद्धार्थ सिंघवी यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय.

Updated On: Sep 9, 2018 05:02 PM IST

एचडीएफची बँकेचे सिद्धार्थ सिंघवी यांची हत्या, गुढ उलगडणार?

मुंबई, 09 सप्टेंबर : गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे अधिकारी सिद्धार्थ सिंघवी यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालंय. नवी मुंबई पोलिसांनी ज्या आरोपीला अटक केली त्यानेच सिंघवी यांचा खून केल्याची कबूली दिलीय. खून करून नवी मुंबईत दुर्गम ठिकाणी मृतदेह लपविल्याची कबूलीही त्याने दिली. गेल्या 5 सप्टेंबरपासून सिद्धार्थ हे बेपत्ता होते.यासंदर्भात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंघवी मुंबईत कमला मिलच्या कार्यालयातून 5 सप्टेंबरला बेपत्ता झाले तर 6 सप्टेंबरला नवी मुंबई पोलिसांनी ऐरोली येथील सेक्टर ११ जवळून सिंघवी यांची गाडी जप्त केली. हा प्रकार गंभीर असल्याचं लक्षात घेत एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयित आरोपी हा 20 वर्षांचा असून मजुर असल्याची महितीही सुत्रांनी दिलीय. पोलिसांनी आत्तापर्यंत 25 लोकांची चौकशी केली असून काही टोल नाक्यांवरचं सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे.

संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या सिद्धार्थ सिंघवी यांच्या पत्नी 5 सप्टेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत त्यांची घरी येण्याची वाट पाहत होत्या. पण सिंघवी काही आलेच नाहीत, त्यानंतर त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपली पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलासह सिंघवी हे मुंबईच्या मलबार हिल परिसरात राहतात.

5 सप्टेंबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:30 वाजता सिंघवी त्यांच्या ऑफिसमधून निघाले आणि 6 सप्टेंबर रोजी त्यांची गाडी ऐरीलोमध्ये सापडली. धक्कादायक म्हणजे त्यांच्या गाडीमध्ये पोलिसांना रक्ताचे डाग आढळून आले. हे रक्ताचे नमुने पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत.

सिद्धार्थ सिंघवी यांच्या गाडीमध्ये त्यांच्यासोबत आणखी कोणीतरी असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. सध्या पोलीस सिंघवी यांचा फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांचं शेवटचं लोकेशन मात्र कमला मिलच दिसतंय. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण खळबळ उडाली आहे.

Loading...

VIDEO: शांत बस म्हणणाऱ्या शिक्षकांमध्येच झाली जोरदार हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2018 05:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close