S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मनसेच्या आंदोलनानंतर कल्याण डोंबिवलीत फेरीवाले परतले

परंतु हे सर्व झाल्यावरसुद्धा पुन्हा फेरीवाल्यांनी फुटपाथवर आपली दुकानं थाटली. तेव्हा घाटकोपरमध्ये तरी मनसैनिकांनी त्यांना तिथून पुन्हा हुसकावून लावलं आहे. त्यांच्या सामानांची तोडफोड केली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 21, 2017 08:41 PM IST

मनसेच्या आंदोलनानंतर कल्याण डोंबिवलीत फेरीवाले परतले

मुंबई,21 ऑक्टोबर: आज मुंबईत ठिकठिकाणी मनसेने आंदोलन केल्यानंतर संध्याकाळी कल्याण डोंबिवली स्थानकांबाहेर फेरीवाले परतले आहे. त्यामुळे सामान्यांच्या समोरची समस्या अजूनही सुटलेली नाही. दरम्यान आपलं हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मनसैनिकांनी सांगितलं आहे.

दिवसभर फेरीवाल्यांच्या विरोधात मनसैनिकांचा हल्लाबोल सुरुच होता. आज संध्याकाळी घाटकोपरमध्येही त्यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या सामानाची तोडफोड केली. घाटकोपरमधल्या एमजी रोड, खोत लेन परिसरातल्या फेरीवाल्यांना हुसकावत असताना त्यांच्या सामानांची तोडफोड केली. फुटपाथ फेरीवाल्यांनी आपली दुकानं थाटू नयेत, असं मनसेच्यावतीनं सांगण्यात आलं होतं. परंतु हे सर्व झाल्यावरसुद्धा पुन्हा फेरीवाल्यांनी फुटपाथवर आपली दुकानं थाटली. तेव्हा घाटकोपरमध्ये तरी मनसैनिकांनी त्यांना तिथून पुन्हा हुसकावून लावलं आहे. त्यांच्या सामानांची तोडफोड केली आहे.

दरम्यान ठाण्यात मनसेने केलेल्या आंदोलनानंतर ठाणे नगर पोलिसांनी 8 लोकांच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेच नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी मनसे पदाधिकारी फरार झाले आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 08:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close