हंसराज अहीर यांचा पराभव तरीही मंत्रिमंडळात मिळणार स्थान, नितीन गडकरींचा दावा

हंसराज अहीर यांचा पराभव तरीही मंत्रिमंडळात मिळणार स्थान, नितीन गडकरींचा दावा

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरीही हंसराज अहीर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. हंसराज अहीर हे आधीच्या सरकारमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री होते.

  • Share this:

नागपूर, 24 मे : लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरीही हंसराज अहीर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा चंद्रपूर मतदारसंघातून पराभव झाला आहे. इथे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश धानोरकर यांचा विजय झाला. या पराभवानंतर भाजपमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण निर्माण झालं. हंसराज अहीर यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार नाही, असं वाटत होतं पण आता नितीन गडकरींनीच याबद्दल आश्वासन दिलं आहे.

15 वर्षं भाजपचा कब्जा

चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर गेली 15 वर्षं भाजपचा कब्जा होता. याआधी हा काँग्रेसचा गड मानला जात होता. त्यामुळेच काँग्रेस पुन्हा एकदा ही जागा मिळवणार का याची चर्चा होती आणि चंद्रपूर ही महाराष्ट्रातली काँग्रेसची एकमेव जागा ठरली.

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या संजय देवतळेंचा पराभव केला होता. हंसराज अहिर यांना त्यावेळी 5 लाख 8 हजार 49 मतं मिळाली तर संजय देवतळे यांना 2 लाख 71 हजार 780 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. या निवडणुकीत आपचे वामनराव चटप यांनाही 2 लाख 4 हजार 413 मतं मिळाली.

यावेळी काँग्रेसला संधी

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वरोरा शिवसेनेकडे आहे तर उरलेल्या जागांवर भाजपचं वर्चस्व आहे.

चंद्रपूरमध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं. चंद्रपूरच्या मतदारांनी यावेळी भाजपला नाकारत काँग्रेसच्या उमेदवाराला संधी दिली. त्यामुळे हंसराज अहिर यांचा पराभव झाला.

==================================================================================

SPECIAL REPORT : 'संभाजीनगर'मध्ये 'वाघा'ची शिकार करण्यात छुप्या शक्तींचा हातभार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2019 10:05 PM IST

ताज्या बातम्या