फाशी घेताना दोरी तुटल्याने वाचला जीव, कारंजा शहरातील घटना

फाशी घेताना दोरी तुटल्याने वाचला जीव, कारंजा शहरातील घटना

कर्मापेक्षा नशीब कसे बळकट असते, याचा प्रत्यय कारंजा शहरात आला आहे. फाशी घेताना दोरी तुटल्याने एकाचा जीव वाचला आहे. विठ्ठल इंगोले (वय-52) असे या व्यक्तीचे नाव आहे.

  • Share this:

किशोर गोमाशे, (प्रतिनिधी)

वाशिम, 5 जुलै- कर्मापेक्षा नशीब कसे बळकट असते, याचा प्रत्यय कारंजा शहरात आला आहे. फाशी घेताना दोरी तुटल्याने एकाचा जीव वाचला आहे. विठ्ठल इंगोले (वय-52) असे या व्यक्तीचे नाव आहे.

गंभीर आजार व घरची आर्थिक परिस्थितीला कंटाळलेल्या विठ्ठल इंगोले यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता. आत्महत्या करण्यासाठी त्यांनी झाडाला दोरी बांधली. दोरी गळ्यात टाकली. परंतु गळफास घेतानी दोरी तुटली व ते जमिनीवर पडले, विठ्ठल यांचा जीव वाचला. विठ्ठल इंगोले यांनी फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कारंजा येथील सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई यांना समजली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून विठ्ठल इंगोले यांना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. विठ्ठलच्या कर्माच्या दोरीपेक्षा नशिबाची दोरी बळकट असल्याची प्रतिक्रिया श्याम सवाई यांनी दिली आहे. 'देव तारी त्याला कोण मारी', या म्हणीचा अनुभव कारंजेकरांनी या घटनेच्या निमित्ताने घेतला.

मॉब लिंचिंग विरोधात रिसोडमध्ये मूक मोर्चा

मॉब लिंचिंग विरोधात रिसोडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. झारखंडमध्ये मॉब लिंचिंगमध्ये तबरेज अंसारी याची हत्या करण्यात आली होती.

Loading...

या हत्येचा निषेध म्हणून मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शहरातील सिव्हिल लाईनमार्गे तहसिल कार्यालयावर पोहोचला. तहसीलदार राजू सुरडकर यांना निवेदनाद्वारे दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. मोर्चात शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.

मॉब लिंचिंग विरोधात अमरावतीत धरणे आंदोलन..

झारखंड येथे मॉब लिंचिंगमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तरबेज अन्सारी यांची हत्या करणाऱ्या आरोपींवर कारवाई करावी व या आरोपींचा बचाव करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. या धरणे आंदोलनात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

VIDEO: सोनं आणि इंधनाचे दर वाढणार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2019 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...