बाळाला जन्म देण्यासाठी ठेवावं लागलं मंगळसूत्र गहाण!

उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आणि खाजगी रुगणलायतील डॉक्टरांच्या अडमुठेपणामुळे चक्क एका महिलेला आपले मंगळसूत्र गहाण ठेवून बाळाला जन्म द्यावा लागलाय.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2018 09:35 PM IST

बाळाला जन्म देण्यासाठी ठेवावं लागलं मंगळसूत्र गहाण!

गणेश गायकवाड, उल्हासनगर, 24 सप्टेंबर : उल्हासनगरमधील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आणि खाजगी रुगणलायतील डॉक्टरांच्या अडमुठेपणामुळे चक्क एका महिलेला आपले मंगळसूत्र गहाण ठेवून बाळाला जन्म द्यावा लागलाय.

जन्म घेतल्या क्षणापासूनच या बाळाला त्याच्या घरातील अठारविश्व दारिद्र्य आणि इथल्या मुजोर व्यवस्थेच्या सामना करावा लागलाय. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या आजीन आपलं सौभाग्याचं लेणं गहाण ठेवल्यामुळे या गोंडस बाळाला हे जग पाहण्याची संधी मिळाली. उल्हासनगर शहरातील शीला हरीनामे यांना गरिबी आणि डॉक्टरांच्या अडमुठेपणामुळे मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलंय.

रुग्णालय एवढ्यावरच थांबलं नाही तर प्रसुतीनंतर अवघ्या काही रुपयांसाठी 20 दिवस सीमाची डिस्चार्ज फाईलही त्यांनी रखडवून ठेवली. सीमाच्या कटुंबियांनी शासकीय प्रसूती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी भावना तेलंग यांच्याकडे दाद मागितली. पण, त्यावर त्यांनी चौकशीचं सरकारीछाप उत्तर दिलं.

अनेकदा श्रीमंताचे आजार गरिबांना गाठतात. मग त्यांना रोग कमी आणि दवाखाना जास्त खातो. सरकार गरिबांसाठीच्या योजनांचा कितीही डंका पिटत असलं तरी निगरगट्ट व्यवस्थेला झालेला आजार बरा होत नाही. म्हणूनच सौभ्याचं लेणं गहाण टाकून इथं गरिबांना जन्म घ्यावा लागतो हे व्यवस्थेचं दुर्दैवं म्हणावं लागेल.

 VIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2018 09:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...