News18 Lokmat

नागपुरात फेरीवाल्यांची मुजोरी, दाम्पत्याला केलेली मारहाण CCTVत कैद

नागपूरच्या सीताबर्डी बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नवदाम्पत्याला भाव करण्यावरून फेरीवाल्यांनी सोमवारी मारहाण केली होती.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 22, 2018 04:53 PM IST

नागपुरात फेरीवाल्यांची मुजोरी, दाम्पत्याला केलेली मारहाण CCTVत कैद

नागपूर 22 फेब्रुवारी : नागपूरच्या सीताबर्डी बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नवदाम्पत्याला भाव करण्यावरून फेरीवाल्यांनी सोमवारी मारहाण केली होती. या मारहाणीच्या घटनेचं CCTV फुटेज आज बाहेर आलं. बर्डीच्या युको बँकेच्या समोर हे नवदांपत्य खरेदी करण्यास गेलं होतं. त्यावेळी किंमतीवरून भाव करणं सुरू असताना त्या दुकानदाराने मारहाण केली.

मारहाणीच्या आधी त्या दोघांनाही दुकानामध्ये बोलावण्यात आलं होतं. ही मारहाण होत असताना आजूबाजूचे हॉकर्स सुद्धा तोंडावर रुमाल बांधून या मारहाणीत सहभागी झाले. बर्डी ही नागपूरातली सर्वात व्यस्त बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत  महिलांची छेड काढण्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत मात्र पोलीस ठोस कारवाई करत नसल्याने गुन्हेगारांना वचक बसत नाही असा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2018 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...