ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचे निधन

महाराष्ट्रातील एक अभ्यासू पत्रकार आणि व्यासंगी लेखक अशी श्री. ह. मो. मराठे यांची ओळख होती. कोकणातील दोडामार्ग तालुक्यातल्या झोळंबे इथे त्यांचा जन्म झाला.

  • Share this:

 पुणे, 2 ऑक्टोबर: ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचं वयाच्या 77व्या वर्षी  दीर्घ आजाराने निधन झालं आहे. काल रात्री 1.30च्या सुमारास त्यांनी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 9 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील एक अभ्यासू पत्रकार आणि व्यासंगी लेखक अशी श्री. ह. मो. मराठे यांची ओळख होती. कोकणातील दोडामार्ग तालुक्यातल्या झोळंबे इथे त्यांचा जन्म झाला. एका अत्यंत गरीब घरात त्यांचा जन्म झाला होता. आईची आजारपण आणि वडलांना कालांतराने झालेला सिझोफ्रेनिया यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती फार बिकट होती. ह.मोंच्या शिक्षणासाठी त्यांच्या भावाने पुढाकार घेतला. त्याच्या टेलरिंगच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून मालवणला त्यांचे शिक्षण त्याने पूर्ण केले.

अशा बिकट परिस्थितीतून आलेल्या ह.मोंनी कॉलेज जीवनापासूनच लेखनात आपला ठसा उमटवला. कॉलेज जीवनापासून त्यांच्या कथा, कादंबऱ्या लेख, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, ललित आणि सत्यकथा या  मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. १९६९मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या लघु कादंबरीमुळे त्यांना लेखक म्हणून ओळख मिळवून दिली. तेव्हाच्या प्रत्येक तरूणाला ती त्याचीच कथा वाटली. प्रा. गांगुर्डे यांनी या कादंबरीचं इंग्रजीत भाषांतर केलं.तिचं नाव ‘द बर्निग ट्रेन’ असं ठेवलं.

त्यांची ‘काळेशार पाणी’ ही दुसरी लघु कादंबरी होती. लीला बावडेकर यांनी तिचे इंग्रजीत भाषांतर केलं. ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ मधून ते  प्रसिद्ध झाले आणि या कादंबरीचे प्रचंड कौतूक करण्यात आले.

त्यानंतर हमोंनी औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यजीवनाचे चित्रण केलं. घोडा, न्यूजस्टोरी, युद्ध, ज्वालामुख, टार्गेट यामधून त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील माणसांची कथा आणि व्यथा मांडली. मार्केट व सॉफ्टवेअर या कादंबऱ्या ही विशेष गाजल्या.

महानगरीय माणसाचे दु:ख मांडणारं साहित्य त्यांनी मराठीत आणलं.नव्हे एक नवील शैलीचं तयार केली.  त्यांचे लेख ,व्यंगलेख विशेष गाजले. त्यांचं 'बालकांड' ही लोकप्रिय झालं. त्यांच्या काळेशार पाणी या कादंबरी वर काही वर्षांपूर्वी डोह हा सिनेमा ही बनला. त्यांचे एक माणूस एक दिवस या लेख मालिकेतले लेखही प्रचंड गाजले.

अशा प्रतिभावंत लेखकाने जगाचा निरोप घेतल्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

ह.मो.मराठे यांची ग्रंथसंपदा

अण्णांची टोपी (कथासंग्रह)

आजची नायिका (उपरोधिक)

इतिवृत्त

इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह)

उलटा आरसा (उपरोधिक)

एक माणूस एक दिवस (भाग १ ते ३)

कलियुग

काळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक)

घोडा

चुनाव रामायण (व्यंगकथा)

ज्वालामुख (कथासंग्रह)

टार्गेट

द बिग बॉस (व्यंगकथा)

दिनमान (उपरोधिक लेख)

देवाची घंटा

न लिहिलेले विषय (वैचारिक)

निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२)

न्यूज स्टोरी

पहिला चहा (भाग १, २). : दैनिक पुढारीमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह.

पोहरा (आत्मकथा; ’बालकांड’चा २रा भाग)

प्रास्ताविक

बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा)

बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे)

मधलं पान (लेखसंग्रह)

मार्केट (१९८६)

मुंबईचे उंदीर (व्यंगकथा)

माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा)

युद्ध

लावा (हिंदी)

वीज (बाल साहित्य)

श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)

सॉफ्टवेअर

स्वर्गसुखाचे package (विनोदी)

हद्दपार

ह.मो. मराठे यांच्या निवडक कथा (कथासंग्रह)

पुस्तिका संपादन करा

आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी

गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ

ब्राह्मण चळवळ कशासाठी?

ब्राह्मणनिंदेची नवी लाट

ब्राह्मणमानस

ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? (२००४)

विद्रोही ब्राह्मण

शिवधर्म

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 08:37 AM IST

ताज्या बातम्या