News18 Lokmat

दसऱ्याच्या दिवशी नगरसेवकाचा भर चौकात हवेत गोळीबार

घटनेला आता आठवडा उलटून गेला आहे. पण आता सोशल मीडीयावर चर्चा सुरू झाली आहे. पोलीस मात्र आठवड्यानंतरही या घटनेबाबत कुठलीच माहिती नसल्याचं सांगत आहेत. नगरसेवक सुरज सातव यांच्याकडच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्वर मधून या गोळ्या हवेत झाडण्यात आल्या होत्या

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2017 10:37 AM IST

दसऱ्याच्या दिवशी नगरसेवकाचा भर चौकात हवेत गोळीबार

बारामती,13 ऑक्टोबर: बारामतीमध्ये दसऱ्याच्या दिवशी भर चौकात सिमोल्लंघनाच्या नावाखाली रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा गोळीबार राष्ट्रवादीचे नगरसेवक सातव यांनीच केला आहे. गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

या घटनेला आता आठवडा उलटून गेला आहे. पण आता सोशल मीडीयावर चर्चा सुरू झाली आहे. पोलीस मात्र आठवड्यानंतरही या घटनेबाबत कुठलीच माहिती नसल्याचं सांगत आहेत. नगरसेवक सुरज सातव यांच्याकडच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्वरमधून या गोळ्या हवेत झाडण्यात आल्या होत्या. उपस्थितांमध्ये रूबाब दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार केला गेलाय. मात्र यामुळे परिसरात दहशत वाढते आहे ती वेगळीच.

आता या प्रकरणी पुढे काही कारवाई होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 10:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...