S M L

गुजरात पोलिसांच्या आडकाठीमुळे वाळूमाफिया पळाले

महाराष्ट्र गुजरात सीमेवर सरपणी नदीत वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांना गुजरात पोलीस अभय देत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.

Sachin Salve | Updated On: Apr 6, 2017 09:46 PM IST

गुजरात पोलिसांच्या आडकाठीमुळे वाळूमाफिया पळाले

06 एप्रिल : महाराष्ट्र गुजरात सीमेवर सरपणी नदीत वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांना गुजरात पोलीस अभय देत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. वाळूमाफियांवर कारवाईसाठी गेलेल्या नवापूरच्या तहसीलदारांशी गुजरातच्या पोलीस अधिकाऱ्यानं हुज्जत घातली.

करंजवेल गावाजवळ सरपणी नदीत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार प्रमोद वसावे यांना मिळाली होती. या माहितीवरुन कारवाईसाठी तहसीलदारांची टीम गेली होती. याबाबत त्यांनी गुजरातच्या उच्छल पोलीस ठाण्याचे अधिकारी एस के चारेल यांनाही सांगण्यात आलं. जेव्हा वाळूमाफिया गुजरातच्या हद्दीत पळाले तेव्हा त्यांच्या बोटी ताब्यात घेण्याबाबत तहसीलदारांनी सांगितलं. 'तुम्ही आदेश देणारे कोण?' असं म्हणत पोलीस अधिकारी चरेल यांनी तहसीलदारांशी हुज्जत घातली.

यावादात वाळूमाफिया मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यामुळs गुजरात पोलिसांची भूमिका वाळूमाफिया धार्जिणी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 09:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close