S M L

गुढीपाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी; नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली आढी

आज भारतीय नवीन वर्षाची सुरवात होते. महाराष्ट्रात गुढीपाडवा तर आंध्र आणि कर्नाटकात याला उगादी असं म्हणतात.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 18, 2018 10:05 AM IST

गुढीपाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी; नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली आढी

18 मार्च : चैत्र शुध्द प्रतिपदेचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तांमधला एक पूर्ण मुहूर्त. आज भारतीय नवीन वर्षाची सुरवात होते. महाराष्ट्रात गुढीपाडवा तर आंध्र आणि कर्नाटकात याला उगादी असं म्हणतात. देशभरत हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा होत असला तरी त्यामागची भावना ही सारखीच आहे आणि हेच सारखेपण, सांस्कृतिक धागा विविधरंगी भारताला एका धाग्यात गुंफून ठेवतो.

चैत्राला सुरवात झाली की सभोवतालच्या सृष्टीतही बदल होवू लगातो. शुष्क आणि पानगळ झालेल्या झाडांना नवी पालवी फुटते. जुन्या गोष्टींच्या आठवणीत आयुष्यात नव्या आनंदाची पालवी फुटते. अर्थाच सण म्हटलं की आनंदाची उधळण असते. प्रेमाच्या नात्यांना बहर येतो आणि हीच तर आपल्या भारताची शान आहे. आजचा सण अवघ्या भारतभर साजरा होतो. त्यात खास आकर्षण असतं ते मुंबईकरांचं.

मुंबईमध्ये गिरगाव, दादर, डोंबिवली, परळसारख्या उपनगरांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचं आयोजन केलं जातं. भगवे फेटे, नऊवारी साड्या, सदरे कुर्ते, भगवे झेंडे, रांगोळ्या, चित्ररथ, प्रतिकृती, देखावे यांच्या सोबतीला ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल असे वातावरण संपूर्ण मुंबईत आज असणार आहे.

गिरगावच्या फडके मंदिरापासून निघणाऱ्या शोभायात्रांची पूर्व तैय्यारी सध्या सुरु आहे. परशुरामाची प्रतिकृती स्वामी रामदासांची प्रतिकृती, खंडोबाराया आणि घारापुरीलेणीचा चित्ररथ हे आकर्षण असणार आहे. प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथवर झालेल्या संचलनात महाराष्ट्रच्या ज्या चित्ररथानं प्रथम क्रमांक पटकावला तोच चित्ररथ शोभायात्रेच्या पुढे असणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की पुण्यनगरी अग्रस्थानी असते. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोल्डन मेमरीज संस्थेनं एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपटांमधली गाणी, आणि सोबत त्या चित्रपटांचे किस्से. उंबरठा, जैत रे जैत, सामना, सिंहासन, पिंजरा, एक होता विदूषक या चित्रपटांमधली निवडक गाणी सादर करण्यात आली.

Loading...
Loading...

गुढीपाडव्याच्या या मंगल क्षणी न्यूज18 लोकमतच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2018 07:48 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close