S M L

अॅडमिशन झाले पण शाळाच गायब !

आरटीई अंतर्गत ज्या शाळांमध्ये अॅडमिशनसाठी शिक्षण विभाग पाठवत आहे. त्या शाळाच जागेवर नाहीत असा अनुभव औरंगाबादेत येत आहे.

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2017 10:56 PM IST

अॅडमिशन झाले पण शाळाच गायब !

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद

11 एप्रिल : केंद्र आणि राज्य सरकार राईट टू एज्युकेशनवर बराच खर्च करत आहे. मात्र प्रत्यक्षात राईट टू एज्युकेशनचे संस्था चालकांनी बारा बाजवले आहेत. शासनाचा उद्देश आणि हेतू चांगलाच आहे. मात्र शिक्षण प्रशासन आणि संस्था चालक यांच्या संगनमतानं पालकांची चांगलीच फरफट होत आहे. आरटीई अंतर्गत ज्या शाळांमध्ये अॅडमिशनसाठी शिक्षण विभाग पाठवत आहे. त्या शाळाच जागेवर नाहीत असा अनुभव औरंगाबादेत येत आहे.

सुनिल खोतकर गेल्या आठ दिवसांपासून आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी चकरा मारतायेत. आरटीई अंतर्गत त्यांच्या मुलाचा प्रवेश सेंट लॅारेंन्स सुपर थर्टी इंग्लिश शाळेत निश्चित झाला. साहजिकच सुनिल खोतकरांना खूप आनंद झाला. आणि ते शाळेच्या पत्त्यावर मुलाचा प्रवेश घेण्यासाठी गेले. शाळेच्या पत्यावर गेल्यानंतर सुनिल खोतकर यांना भोवळच आली. कारण शिक्षण विभागानं दिलेल्या पत्यावर शाळा काय एक खोली सुद्धा नव्हती. त्याठिकाणी त्यांना आढळली फक्त फेन्सिंग केलेली मोकळी जागा...



पांडुरंग सातपुते यांच्याही मुलाचा आरटीई अंतर्गत किड्स झी शाळेत प्रवेश निश्चित झाला. ते सुद्धा शाळेच्या पत्यावर पोहोचले पण त्यांनाही शाळा दिसलीच नाही.

प्रवेशासाठी त्रस्त झालेल्या आणि चक्रावलेल्या दोन्ही पालकांना घेऊन आयबीएन लोकमत शिक्षणाधिकारी एम.के देशमुख यांच्याकडं गेलं. तेव्हा शिक्षणाधिकारी यांनी आधी कॅमेरा बंद करा नंतरच बोलतो असा इशारा त्यांनी दिला. आम्ही त्यांना जाब विचारला.

शेवटी शिक्षणाधिकारी यांनी आपल्या ठेवणीतलं हत्यार बाहेर काढलं...आणि कारवाई करू असं आश्वासन दिलं.

Loading...
Loading...

हे प्रकरण औरंगाबादचं असलं तरी असा अनुभव सगळीकडंच पाहायला मिळतोय. संस्थाचालक आणि शिक्षण विभाग संगनमत करून पालकांची पिळवणूक करतात. पालकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक अधिकारी दुर्लक्ष करतात. शेवटी पालकचं कंटाळून विषय सोडून देतात. खरंच बालकांना राईट टू एज्युकेशन आहे का..हाच प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 10:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close