Ground Report: पावसाळ्यातील निसर्गसंपन्न कोपरे-मांडवेची उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण

अनेक हिंदी-मराठी चित्रपटात झळकलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे परिसराला यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 18, 2019 05:43 PM IST

Ground Report: पावसाळ्यातील निसर्गसंपन्न कोपरे-मांडवेची उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण

रायचंद शिंदे, (प्रतिनिधी)

शिरुर, 18 मे- अनेक हिंदी-मराठी चित्रपटात झळकलेल्या जुन्नर तालुक्यातील कोपरे-मांडवे परिसराला यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या आणि आदिवासी महादेव कोळी समाजाचं वास्तव्य असलेल्या मुथाळने, कोपरे, आणि मांडवे या परिसरात यंदाही दुष्काळाचं भीषण संकट पाहायला मिळतंय. स्वातंत्र्यानंतर आजतागायत आदिवासींना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.

सोलापुरातील आधुनिक भगीरथ..गावाला पाणी देण्यासाठी त्याने विकले आईचे दागिने

नगर-कल्याण महामार्गाच्या उत्तरेला उदापूर गावातून थोडं पुढं गेलं का नागमोडी वळणं घेऊन उंच घाटमाथ्यावर पोहोचण्यासाठी मुथाळने घाट पार करावा लागतो. घाटमाथा पार करून गेल्यावर पाहिलं गाव लागतं ते मुथाळने. इथे ग्रामपंचायतीच्या एकमेव विहिरीत भर उन्हात खडक फोडण्याचं काम सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या जाणवत आहे. या परिसरातून जाणारी आणि पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी मांडवी नदीवर छोटे बंधारे बांधल्यास पाण्याची सोय तरी मिटेल, असं येथील बबन गभाले यांनी सांगितलं. मुथाळने सोडलं आणि आम्ही थोडं पुढे सरकलो तर रस्त्याच्या बाजूला एका शिवकालीन टाकीमधून काही महिला, पुरुष आणि छोट्या मुली भरउन्हात दुपारी पाणी वाहण्याचं काम करत होत्या. त्यांनीही आपल्या वेदना आम्हाला सांगितल्या. दिवसभर फक्त पाणी वाहण्यातच वेळ जातो. मग कामावर कधी जायचं, असा प्रश्नही त्यातील एकीनं केला.

शेतकऱ्याच्या लेकीचा असं लग्न आधी पाहिलं नसेल, वऱ्हाडीही झाले अवाक

Loading...

थोडं पुढे सरकल्यावर नागमोडी आणि आडवळणाचा रस्ता पार करत मांडवे गावात पोहोचण्याआधी डाव्या बाजूस उंच डोंगराच्या तळाशी एक भली मोठी घळ दृष्टीस पडली. पावसाळ्यात खळखळून दुथडी वाहणारी हीच का मांडवी नदी? असा प्रश्नही मनात आला. मांडवी नदीतल्या एका गढूळलेल्या डोहावर काही बाया आणि पोरी पाणी भरून डोक्यावरुन वाहत होत्या. त्यातल्या एक होत्या गावच्या माजी सरपंच सोनाबाई दाभाडे. लग्नाला 25 वर्षे झाले पण डोक्यावरचा हंडा मात्र उतरला नाहीच. पण दूषित पाण्यामुळे गावात उन्हाळ्यात विविध आजार पसरल्याचे त्यांनी सांगितलं.

सततची नापिकी व मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोईजड झाल्याने शेतकऱ्यानं केली आत्महत्या

मांडवे गावातलं पाण्याचं हे भीषण वास्तव पाहिल्यावर आम्ही पुढचा प्रवास सुरु केला. आम्ही सायंकाळी पोहोचलो ते कोपरे गावात. पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील शेवटचं गाव. म्हणून कोपरे असं नाव पडलं असावं. गावात प्रवेश केला तेव्हा इथेही गावातल्या महिला आणि लहान मुली आम्हाला डोक्यावरून पाणी वाहताना दिसल्या. संपूर्ण दिवसभरात या परिसरात आम्हाला फक्त एकच टँकर जाताना नजरेस पडला. तोही मोकळा. स्थानिक महिला सांगत होत्या की टँकर रोज नाही येत शिवाय आला तरी गढूळ पाणि घेऊन येतो. दहावीत गेलेली सूवर्णा सांगत होती की दिवसभर पाणी आणावं लागतं. शिवाय जोडीला छोटी बहिणही पाणी वाहते. डोक्यावरचा हंडा केव्हा उतरणार माहीत नाही, असंही ती म्हणाली. तर अशी ही कोपरे- मांडवे परिसरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे. प्रशासन आणि राज्यकर्ते मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांत आजही सुस्त आहेत. याउलट शेजारी असलेल्या नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मात्र आदिवासी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी गावागावात पाण्याची सोय केल्याचं नव्वदीत पदार्पण केलेल्या धुळाजी बाबा यांनी नमूद केलं. खरंच जळजळीत वास्तव आहे कोपरे-मांडवे गावचं. कधी संपणार ही पाण्याची वणवण सांगता नाही येत.


SPECIAL REPORT: दुष्काळ, चिंता, हृदयविकाराचा झटका आणि...मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 05:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...