काबाडकष्ट करुन थकलेले हात आता गिरवतायत बाराखडी!

मुरबाड तालुक्यात सध्या एक आगळीवेगळी शाळा भरली आहे. या शाळेत असलेले विद्यार्थी लहान मुलं नाहीत, तरुण नाहीत तर चक्क आजी-आजोबा आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2018 02:15 PM IST

काबाडकष्ट करुन थकलेले हात आता गिरवतायत बाराखडी!

30 जानेवारी : मुरबाड तालुक्यात सध्या एक आगळीवेगळी शाळा भरली आहे. या शाळेत असलेले विद्यार्थी लहान मुलं नाहीत, तरुण नाहीत तर चक्क आजी-आजोबा आहेत. आयुष्यभर काबाडकष्ट करुन थकलेले हात आता बाराखडी गिरवत आहेत.

आजोबांना धोतर, सदरा आणि टोपी तर आजीला गुलाबी रंगाची नऊवारी असा पोशाख ठेवण्यात आला आहे. यात काही आजी गुलाबी नऊवारीतही आहेत. त्या या शाळेतील सिनीअर विद्यार्थिनी आहे.

जवळपास 10 एकर जागेत निसर्गाच्या सानिध्यात ही शाळा आहे. मुरबाडजवळील फांगणे गावात पहिल्यावहिल्या आजीबाईंच्या शाळेची दखल देशविदेशातील व्यक्तींनी घेतल्यानंतर या शाळेला सुरुवात करणाऱ्या योगेंद्र बांगर यांनी आजी आजोबांच्या शाळेची संकल्पना मांडली.

लहान मुलांना लाजवेल अशा उत्साहात हे सगळे शाळेत येतात. नातवंडांना खेळवण्याचे वयात पाटी-पेन्सिल हाती घेणाऱ्या आजी-आजोबांच्या या उत्साहाला न्यूज 18 लोकमतचा सलाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 02:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...