राज्यात 557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्चला मतदान, हे आहे वेळापत्रक!

82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठीही 24 मार्च ला मतदान होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 06:47 PM IST

राज्यात 557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्चला मतदान, हे आहे वेळापत्रक!

मुंबई 21 फेब्रुवारी :  राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 24 मार्च ला मतदान होणार आहे. त्यासाठी  आचारसंहिताही लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी दिली आहे.


सहारिया यांनी सांगितले की, एप्रिल 2019 ते जून 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच थेट सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील मतदान होणार आहे. त्यासाठी नामांकन अर्ज 5 ते 9 मार्च या कालावधीत स्वीकारले जातील.


त्यांची छाननी 11 मार्च रोजी होईल. अर्ज 13 मार्च पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांच वाटप होईल. मतदान 24 मार्च रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 25 मार्चला होणार आहे.

Loading...


निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे- 3, रायगड- 20, रत्नागिरी- 11, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 48, धुळे- 18, जळगाव- 12, अहमदगनर- 3, नंदुरबार- 5, पुणे- 20, सोलापूर- 8, सातारा- 44, कोल्हापूर- 3, औरंगाबाद- 3, उस्मानाबाद- 2, परभणी- 1, अमरावती- 1, अकोला- 14, वाशीम- 32, बुलडाणा- 2, नागपूर- 2, वर्धा- 298, चंद्रपूर- 1 आणि गडचिरोली- 2. एकूण- 557


पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जागा:

ठाणे- 1, रायगड- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 4, धुळे- 1, जळगाव- 2, अहमदगनर- 4, नंदुरबार- 1, पुणे- 3, सोलापूर- 3, सातारा- 6, सांगली- 2, कोल्हापूर- 8, बीड- 1, नांदेड- 6, उस्मानाबाद- 2, परभणी- 2, अकोला- 3, यवतमाळ- 1, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 6. एकूण- 82

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 06:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...