News18 Lokmat

गडकरींपाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातही भाजप पराभूत

नागपूर जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने चांगले यश मिळवले आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2018 07:28 PM IST

गडकरींपाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातही भाजप पराभूत

नागपूर, 27 सप्टेंबर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 374 जागांपैकी 218 ठिकाणी भाजपने जागा मिळवल्या. पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मुळ गाव धापेवाडा आणि गडकरींनी दत्तक घेतलेले पाचगाव या ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले फेटरी गावातही भाजपला पराभव स्विकारावा लागला.

नागपूर जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाने चांगले यश मिळवले आहे. काटोल आणि नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी बहुतांश ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे.

जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला १३ तालुक्यात सकाळी सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्म गाव असलेल्या धापेवाडा इथं काँग्रेस समर्थित पॅनेलचे सुरेश डांगरे सरपंचपदी निवडून आले. धापेवाड्यात काँग्रेस समर्थित पॅनेलचे १६ तर भाजप समर्थित पॅनेलचा केवळ १ उमेदवार निवडून आला.

यासोबतच खासदार दत्तक ग्राम योजनेअंतर्गत गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या उमरेड तालुक्यातील पाचगाव इथं काँग्रेस समर्थित पॅनेलच्या उषा ठाकरे विजय झाल्या.

Loading...

नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी सरपंच आणि सदस्यपदासाठी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ८०. २७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

दरम्यान, या निकालानंतर सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्याच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या भुलथापा आता लोकांना कळल्या असल्याने भाजपला पराभव स्विकारावा लागला असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख म्हणाले.

============================================================

VIDEO : ड्रोनच्या नजरेतून पुण्यातील पाण्याचा हाहाकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...