S M L

डीएसकेंची मालमत्ता जप्त करण्याचे राज्य शासनाचे आदेश

यामध्ये 124 ठिकाणी असलेल्या जमिनी, 276 बँकेची खाती, आणि 46 वाहनांचा समावेश आहे. जागांमध्ये सर्वाधिक जागा पुण्याजवळच्या फुरसुंगीमध्ये आहे. तिथे डीएसकेंचे 107 प्लॉट्स आहेत.

Sonali Deshpande | Updated On: May 12, 2018 03:43 PM IST

डीएसकेंची मालमत्ता जप्त करण्याचे राज्य शासनाचे आदेश

पुणे, 12 मे : बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांची मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना राज्य सरकारनं काढलीये. यामध्ये 124 ठिकाणी असलेल्या जमिनी, 276 बँकेची खाती, आणि 46 वाहनांचा समावेश आहे. जागांमध्ये सर्वाधिक जागा पुण्याजवळच्या फुरसुंगीमध्ये आहे. तिथे डीएसकेंचे 107 प्लॉट्स आहेत.

त्याव्यतिरिक्त बाणेर, पुरंदर, महाबळेश्वर, रत्नागिरी, पेरणे, मालेगाव आणि मिरज या ठिकाणच्या जागांचा समावेश आहे. तर कंपनीच्या नावे आणि वैयक्तिक अशी एकूण 276 बँक खाती गोठवण्यात येणार आहेत. जप्त होणाऱ्या मालमत्तेमध्ये 39 चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. यात टोयोटा लँड क्रूझर, ऑडी, BMW, टोयोटा फॉर्च्युनर, इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाड्यांचा समावेश आहे.

डीएसकेंच्या मालमत्ता शोधून त्याची यादी जिल्हा प्रशासनांना दिल्या होत्या. ती यादी सरकारकडे सादर करण्यात आल्यावर आता अधिसूचना काढली गेलीये.

काय काय आहे मालमत्ता?

- 124 ठिकाणी जमिनी

Loading...

- पुण्याजवळच्या फुरसुंगीमध्ये 107 जमिनी

- बाणेर, पुरंदर, महाबळेश्वर, रत्नागिरी, पेरणेमध्ये जमिनी

- मालेगाव आणि मिरजमधल्या जमिनीही जप्त

- कंपनीची आणि वैयक्तिक मिळून 276 खाती गोठवली

- 39 चारचाकी, 7 दुचाकी जप्त

- टोयोटा लँड क्रूझर, ऑडी, BMW गाड्या जप्त

- टोयोटा फॉर्च्युनर, इनोव्हा आणि स्कॉर्पिओचाही समावेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2018 03:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close